पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या मातोश्रींची रक्ततुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:14 IST2021-05-18T04:14:05+5:302021-05-18T04:14:05+5:30

फोटो पी १७ नांदगाव नांदगाव पेठ : राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री ...

Blood of mother of Guardian Minister Yashomati Thakur | पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या मातोश्रींची रक्ततुला

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या मातोश्रींची रक्ततुला

फोटो पी १७ नांदगाव

नांदगाव पेठ : राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. यशोमती ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी नांदगाव पेठ येथील ग्रामपंचायत भवनात विविध कार्यक्रम पार पडले. तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये २११ रक्तदात्यांनी रक्तदान केले. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या मातोश्री पुष्पमाला ठाकूर यांची रक्ततुलादेखील यावेळी करण्यात आली, तर पालकमंत्र्यांची कन्या आकांक्षा यांच्यावतीने रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.

सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, त्या अनुषंगाने सोमवारी नांदगाव पेठ युवक काँग्रेस, काँग्रेस कमिटी व यशोमती ठाकूर मित्रमंडळ अमरावती तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत भवनात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य बाळासाहेब देशमुख, श्रीधर राऊत, छत्रपती पटके, किशोर नागापुरे, मोरेश्वर इंगळे, नंदू कुकडे, पंकज गायगोले, जगदीश इंगोले, मो. परवेज बाबू मो. साबीर, राजेश बोडखे, पंकज शेंडे, आकाश देशमुख, विनोद डांगे, बाळू पंढरीकर, भाऊराव कापडे, बापूराव सदावर्ते, गजानन इंगळे, विजय राऊत, अविनाश यावले, बाळू भुस्कडे, नितीन शेंडे, राजू पटेल, सुनील जवके, अमित यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Blood of mother of Guardian Minister Yashomati Thakur