महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाद्वारे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:12 IST2021-04-04T04:12:32+5:302021-04-04T04:12:32+5:30

अमरावती : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि राज्यात असलेला रक्ताचा तुटवडा व दवाखान्यात रुग्णांना भासत असलेली रक्ताची कमतरता लक्षात घेता, ...

Blood donation camp by Maharashtra Prantik Tailik Mahasabha | महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाद्वारे रक्तदान शिबिर

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाद्वारे रक्तदान शिबिर

अमरावती : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि राज्यात असलेला रक्ताचा तुटवडा व दवाखान्यात रुग्णांना भासत असलेली रक्ताची कमतरता लक्षात घेता, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अमरावतीतर्फे खासदार रामदास तडस व विभागीय अध्यक्ष संजय हिंगासपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर गुरुवारी विठ्ठल मंदिरात घेण्यात आले. यात २०१ दात्यांनी रक्तदान केले. यावेळी मुख्य अतिथी म्हणून संंजय हिंगासपुरे, संंजय तिरथकर, संंजय शिरभाते, राजू हजारे, अवी देऊळकर, विजय शिरभाते, अविनाश जसवंते, किरण गुलवाडे, विनोद मोदी, किशोर जिरापुरे, दिनेश फणसे, बाळासाहेब लोहारे, चंदू जावरे, सुनील चौकडे उपस्थित होते. सर्वांनी रक्तदान शिबिरात सहभागी होऊन संंजय हिंगासपुरे यांना शुभेच्छा दिल्या. प्रत्येक रक्तदात्याला भेटवस्तू म्हणून एक प्रवासी बॕॅग देण्यात आली.

कार्यक्रमासाठी सागर शिरभाते, अमोल आगाशे, सचिन फणसे, स्वप्निल खेडकर, वैभव बिजवे, कुशल बिजवे, शुभम माथुरकर, पीयूश हिंगासपुरे, अभिजित खोरगडे, विभागीय अध्यक्ष सागर शिरभाते, विदर्भ उपाध्यक्ष अमोल आगाशे, कार्याध्यक्ष कुशल बिजवे, उपाध्यक्ष वैभव बिजवे, शहर अध्यक्ष सचिन फणसे, महासचिव स्वप्निल खेडकर, सविता भागवत व रुपाली शहाडे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Blood donation camp by Maharashtra Prantik Tailik Mahasabha