शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

आमला ग्रा.पं.वर भाजपाचा झेंडा

By admin | Updated: May 20, 2015 01:11 IST

तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या आमला विश्वेश्वरच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक रविवारी पार पडली.

चांदूररेल्वे : तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या आमला विश्वेश्वरच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक रविवारी पार पडली. सरपंचपदी रजनी ज्ञानेश्वर मालखेडे व उपसरपंचपदी रामेश्वर भीमराव किरणापुरे अविरोध निवडून आले. यावेळी भाजपाने आमला विश्वेश्वर ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकविला आहे. सर्वसाधारण (स्त्री) प्रवर्गासाठी राखीव असलेल्या सरपंचपदासाठी रजनी ज्ञानेश्वर मालखेडे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्या अविरोध निवडून आल्यात. उपसरपंचपदाच्या निवडणुकीतून दत्तात्रेय बाबुप्रसाद दुबे यांनी माघार घेतल्यामुळे रामेश्वर भीमराव किरणापुरे हे अविरोध निवडून आले. भाजपप्रणित आदर्श ग्रामविकास पॅनेलने १३ पैकी १० जागांवर वर्चस्व सिद्ध केले आहे. यावेळी ग्रा. पं. सदस्य राजेश पखाले, माधुरी सतीश वासनकर, विलास बकाले, उज्ज्वला एकनाथ घोडमारे, वीरेंद्र बकाले, अर्चना राहुल काळबांडे, कल्पना प्रमोद केने, विनोद नागरीकर, शैला विजय डोंगरे, अन्नपूर्णा रामराव उईके, दत्तात्रेय दुबे उपस्थित होते. निवडणुकीसाठी अध्यासी अधिकारी म्हणून एस. यू. भांडे, ग्रामविकास अधिकारी के. जी. देशमुख यांनी काम पाहिले. निवडणुकीच्या विजयात पंचायत समिती सदस्य नीलिमा होले, विद्यासागर होले, अरविंद बकाले, रमेश बकाले, किशोर मालखेडे, माजी सरपंच माणिकराव केने, माजी प्राचार्य हरगोविंद होले, प्रल्हादराव बकाले, माणिकराव महाराज, प्रशांत घाटोळ, नरेंद्र नाल्हे, मनोहर पाचपोर, विनोद बकाले, प्रवीण बकाले, अविनाश बकाले, आखरे गुरुजी, शालिग्राम नागरीकर, सचिन होले, संतोष कळमकर, युवराज डांगे, हर्षल बकाले, संजू बकाले, सविता पेंदाम, पुष्पा नागोसे, विजय शिरपूरकर, देवीदास गहुकार यांच्यासह अनेकांचा मोलाचा वाटा आहे. (तालुका प्रतिनिधी)