शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी मुलींच्या वसतिगृहाखालीच 'बीअर शॉपी'

By admin | Updated: June 28, 2015 00:23 IST

येथील राठीनगरस्थित संकुलात आदिवासी विकास विभागामार्फत सुरु असलेल्या आदिवासी मुलींच्या वसतिगृहाला नियमबाह्य मान्यता देण्यात आली आहे.

नियमांना बगल : वाहनतळाच्या जागेवर मेस, प्रसाधनगृहाचा अभावगणेश वासनिक अमरावतीयेथील राठीनगरस्थित संकुलात आदिवासी विकास विभागामार्फत सुरु असलेल्या आदिवासी मुलींच्या वसतिगृहाला नियमबाह्य मान्यता देण्यात आली आहे. या संकुलात खाली बीअर शॉपी तर वरच्या माळ्यावर वसतिगृह अशी विचित्र परिस्थिती आहे. मुलींंसाठी हे वसतिगृह धोकादायक असताना अधिकाऱ्यांनी मान्यता दिली कशी? हा संशोधनाचा विषय आहे.शासनाने आदिवासी मुला- मुलींच्या वसतिगृहाची जबाबदारी आदिवासी विकास विभागावर सोपविली. त्यानुसार काही वसतिगृहे स्वत:ची तर काही भाडे तत्त्वावर सुरु आहेत. परंतु ज्या खासगी इमारतीत वसतिगृहे आहेत तेथे मोठ्या प्रमाणात गैरव्यवस्था असल्याच्या तक्रारी आहेत. अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल व्हावेतनियम डावलून आदिवासी मुलींचे वसतिगृह सुरु करण्याचा प्रताप करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, ही मागणी आहे. या संकुलात खाली बियर शॉपी असताना वसतिगृह सुरु केल्याबद्दल अप्पर आयुक्तांना अल्टिमेटम दिला असून धरणे देऊन ही मागणी प्रशासनापुढे मांडली जाईल, असे एनएसयूआयचे प्रदेश उपाध्यक्ष अक्षय भुयार यांनी सांगितले.हे आहेत निकषमुले किंवा मुलींचे वसतिगृह सुरु करायचे असल्यास ते सर्व सोयींनी युक्त असणे आवश्यक आहे. या वसतिगृहाला मैदान, स्वच्छतागृह, खेळाचे प्रांगण, वाहनतळ, अभ्यासासाठी कक्ष, स्वतंत्र निवासव्यवस्था, प्रसाधनगृह, भोजन व्यवस्थेचा समावेश आहे.वसतिगृहांसाठी इमारती भाड्याने घेण्याचे शासन धोरण आहे. राठीनगरातील या वसतिगृहाबाबत तक्रारी आल्या आहेत. नवीन इमारतीसंदर्भात प्रकल्प अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविला आहे. पर्यायी व्यवस्था होताच हे वसतिगृह येथून हलविले जाईल. - महादेव राघोर्ते, उपायुक्त, आदिवासी विकास विभाग.मुलींच्या वसतिगृहात आवश्यक त्या सोयी उपलब्ध करुन देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. नियमांना डावलून वसतिगृह सुरु असणे ही गंभीर बाब आहे. आदिवासी मुलींचा हा प्रश्न सोडविण्यासाठी समाज रस्त्यावर येईल. पुढील परिणाम गंभीर होतील.- राजू मसराम, नगरसेवक.