शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

रणरागिणींचा लढा पेटला

By admin | Updated: May 23, 2015 00:31 IST

तरिदेखील एक्साईज दारु विक्रेत्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्या महिलांनी केला.

अमरावती : तरिदेखील एक्साईज दारु विक्रेत्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्या महिलांनी केला. या दारु विक्रीच्या दुकानाबाबत होत असलेले राजकारण, प्रशासन स्तरावर दिरंगाई या सर्व बाबी परिसरातील महिलांनी आ. राणा यांच्या समोर विषद केल्यात. लोकभावनेला साद देत आ. रवी राणा यांनी शुक्रवारी आपण स्वत: हे दारु विक्रीचे दुकान बंद करु, असा शब्द महिलांना दिला होता. त्यानुसार भाजीबाजार परिसरात असलेल्या गणपती मंदिरातून या आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला. आ. राणा यांच्या नेतृत्वात असंख्य महिला, पुरुष ढोल ताशांचा गजर करत पायी चालत आले. थेट दारु विक्रीच्या दुकानावर धडक दिली. मात्र या दारु दुकानाविरुद्ध आंदोलन होणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळताच तत्पुर्वी हे दुकान बंद करण्यात आले होते, हे विशेष. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात होता. काही वेळ आ. राणा यांच्या नेतृत्त्वात महिलांनी बंद असलेल्या दारु दुकानासमोर आंदोलन केले. दरम्यान एक़्साईजच्या अधिकाऱ्यांनी बंद असलेले दारुचे दुकान उघडले तेंव्हा आंदोलक महिलांनी दुकानाच्या आत धडक दिली. यावेळी पोलिसांची एकच तारांबळ उडाली. अखेर आ. राणा यांनी आंदोलक महिलांची समजूत घातली. या दुकानाला टाळे लावण्याची कारवाई होत असून थोडे शांत होण्याचा सल्ला दिला. त्यानंतर दारुबंदीच्या मागणीसाठी आक्रमक होणाऱ्या महिला काहीशा शांत झाल्यात. दुकानाचे शटर लावून आ. राणा यांच्यासह एक्साईचे अधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांनी दारुच्या बाटल्या मोजून त्या सील केल्या. त्यानंतर दारु विक्रीच्या दुकानाला टाळे लावण्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्याची कारवाई करण्यात आली. दुकानाला टाळे लागताच महिलांनी एकच जल्लोष केला. ढोल ताशाच्या गजरात युवकांनी नाचून आनंदोत्सव साजरा केला. या आंदोलनात कुंदा अनासाने, शालीनी रत्नपारखी, कोकीळा सोनोने, अंजली पाठक, रश्मी उपाध्ये, लता राजगुरे, चंद्रकला फणसे, उषा साऊरकर, रेखा दवंडे, शोभा खेडेकर, माया करुले, निमल करुले, संजय हिंगासपुरे, शैलेंद्र कस्तुरे, नितीन बोरेकर, अजय बोबडे, बबन रडके, सचिन कोराट, चंद्रकांत जावरे, लखन राज, हरिष साऊरकर, आकाश राजगुरे आदी सहभागी होते.बाटलीतील दारु रिकामी करताच झाला जल्लोषदारु दुकानाला टाळे लावण्याची कार्यवाही पूर्ण होताच दुकानाबाहेर येऊन आ. रवी राणा आणि त्यांच्या समर्थकांनी बाटलीतील दारु रिकामी करुन हे दुकान बंद झाल्याची घोषणा केली. यावेळी एकच जल्लोष करताना आ. राणा यांच्या समर्थनार्थ नारेबाजी करण्यात आली. तर दुसरीकडे महिला आंदोलकांच्या हातात असलेल्या बाटलीतून दारु रिकामी होत असतानाचे बघून काही अंतरावर असलेल्या दारुड्यांचा जीव कासावीस होताना पाहावयास मिळाला.राणांच्या आंदोलनाने दुसरेही दुकान बंदच्या मार्गी?आ. रवी राणा यांनी लोकभावनेचा आदर आणि महिलांची मागणी लक्षात घेता यापूर्वी स्थानिक फ्रेजरपुरा स्थित देशी दारु विक्रीचे दुकानाविरुद्ध आंदोलन उभारले होते. हे दुकान फ्रेजरपुऱ्यातून हद्दपार करण्यात त्यांना यश मिळाले. आता भाजीबाजारातील दारु विक्रीच्या दुकानाविरुद्ध आंदोलन सुरु केले आहे. तुर्तास दारु विक्रीचे दुकानाला टाळे लावण्यात आले असले तरी जिल्हा प्रशासन याबाबत कोणता निर्णय घेतात, हे लवकरच स्पष्ट होईल.