शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जासाठी बँकांना हवे तारण

By admin | Updated: April 30, 2016 00:14 IST

एक लाखापर्यतच्या पीक कर्जासाठी कुठलेही तारण घेऊ नये असे रिझर्व्ह बँकेचे निर्देश असतांना बँका शेतकऱ्यांना कर्जासाठी जामिन मागीत नियमाचे सर्रास उल्लंघन करीत आहे.

कारवाई केव्हा ? : रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे सर्रास उल्लंघनअमरावती : एक लाखापर्यतच्या पीक कर्जासाठी कुठलेही तारण घेऊ नये असे रिझर्व्ह बँकेचे निर्देश असतांना बँका शेतकऱ्यांना कर्जासाठी जामिन मागीत नियमाचे सर्रास उल्लंघन करीत आहे. शेतकऱ्यांनी याविषयी जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र जिल्हाप्रशासनाच्या वतीने गांर्भीयाने घेतले नसल्याने शेतकऱ्यांची पिळवणूक केल्या जात आहे. यावर्षी पेरणी पश्चात दडी, नैसर्गीक आपत्ती, यामुळे दुष्काळसदृष्य स्थिती आहे आणेवारी देखील ५० पैश्याच्या आत असल्याने शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वसूलीस स्थगीती व पीक कर्जाच्या शेतकऱ्यांच्या संमतीने ५ हप्त्यामध्ये पुनर्गठन करण्यात येणार आहे.तसेच शेतकऱ्यांना ३० जूनच्या आत पीक कर्ज देण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. यंदाचा खरीप हंगाम महिन्याभऱ्यावर आला आहे. त्यामुळे शेतकरी पीककर्ज घेण्यासाठी बँकामध्ये गर्दी करीत आहे. पीक कर्ज बँकांना बॅकेच्यावतीने शेतकऱ्यांना विविध कागदपत्रांची मागणी करण्यात येते यामध्ये ७/१२, आठ अ, हैसीयत दाखला, अन्य बॅकाकडून कर्ज घेतले नसल्याचा दाखला, यासह रिपोर्ट व जामीन द्यावा लागतो, मात्र रिझर्व्ह बॅकेच्या कृषी कर्जाबाबतच्या सुधारीत योजनेनुसार एक लाख रुपयापर्यतच्या कर्जासाठी कुठल्याची जामिनाची आवश्यकता नाही. तरीही जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बॅका, यांच्याकडून सदर मर्यादेच्या आतील कृषी कर्जाची तसेच ई-कराराची नोंद घेण्याबाबत तलांठयाकडे पाठवीत आहे. शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा बॅकेचे अधिकारी व कर्मचारी फायदा घेत आहे व त्यांना नाहक त्रास होत आहे. अनेक बॅका शेतकऱ्यांना एक लाखाच्या आत कर्जासाठी जामीन मागीत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीरतेने घेऊन अश्या बँकावर कारवाई करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)एक लाखाच्या कर्जाची ७/१२ नोंद नकोएक लाखाच्या आत कर्ज घेतले असल्यास त्याची नोंद सात-बाऱ्यावर करुन बोजा चढविण्यात येतो. हा बोजा चढविल्यानंतर सदर शेताचे खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प होता, एक लाखाच्या आत कर्ज घेतले तर बँकांनी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर नोंद घेण्याचा आग्रह करु नये अश्या रिझर्व्ह बँकेच्या सूचना आहेत.