शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं.ची आमसभा घेण्यास टाळाटाळ

By admin | Updated: March 23, 2015 00:32 IST

सावलीखेडा ग्रामपंचायतीची मासिक सभा सरपंच-सचिवांनी सहा महिन्यांपासून घेतली नाही.

धारणी: सावलीखेडा ग्रामपंचायतीची मासिक सभा सरपंच-सचिवांनी सहा महिन्यांपासून घेतली नाही. त्यामुळे विकासकामे खोळंबली असून मुंबई ग्रा. पं. अधिनियम १९५८ प्रमाणे सरपंचाचे पद रद्द करून सचिवांना निलंबित करण्याची लेखी तक्रार उपसरपंचासह ग्रा. पं. सदस्यांनी जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्यासह बीडीओंकडे केली आहे. तालुक्यातील ग्रा. पं. सावलीखेडाची मासिक सभा नियमानुसार दर महिन्यात घेणे बंधनकारक आहे. त्यात गावातील विकासात्मक कामांचा आढावा, योजनांची माहिती देणे गरजेचे आहे. मात्र आॅक्टोबर २०१४ ते मार्च २०१५ पर्यंत सावलीखेडा ग्रा. पं. सचिव/सरपंचाने मासिक सभाच न घेतल्यामुळे गावातील पूर्ण विकासकामे ठप्प झाली आहेत. सचिव हा मुख्यालयी सतत गैरहजर राहत असल्यामुळे विकासकामांचा निधी मार्चमध्ये खर्च झाला नाही. तसेच मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ प्रमाणे कलम नं. ३६ नुसार मासिक सभेची नोटीस तीन दिवसांआधी देणे गरजेचे आहे. मात्र तरीही सहा महिन्यांपासून सचिवांनी मासिक सभा घेतली नाही. यासंदर्भात ग्रामपंचायत उपसरपंचा विमला रोकडे, सदस्य किशोर मावस्कर, द्रोपती धांडे, रिचुबाई दारसींबे, गंगाराम मावस्कर इत्यादींनी संबंधित सचिवावर ग्रा. पं. मुंबई अधिनियमांतर्गत निलंबनाची कारवाई करून सरपंचाचे पदही रद्द करावे, अशी तक्रार बीडीओ धारणीसह जि. प. मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे पाठविली आहे. ग्रामपंचायतीची मासिक सभा गेल्या सहा महिन्यांपासून झाली नसल्याने सावलीखेड्याच्या विकासाचे अनेक मुद्दे प्रलंबित आहेत. सरपंच व सचिवांच्या अनास्थेमुले विकासाचे मुद्देच मार्गी लागत नसल्याने सावलीखेडावासी हैराण झाले आहेत. सरपंच-सचिवांची चौकशी करून ग्रामपंचायतीची आमसभा न घेण्याच्या कारणांचे विश्लेषण करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडूून केली जात आहे. यात दोघेही दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)