शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

सहायक आयुक्तांचे ‘आॅन दी स्पॉट’ निलंबन

By admin | Updated: September 30, 2015 00:24 IST

भाजीबाजार झोन क्रमांक ५ च्या सहायक आयुक्त सुषमा मकेश्वर यांचे मंगळवारी ‘आॅन दी स्पॉट’ निलंबन करण्यात आले.

महापालिका आयुक्तांचा निर्णय : कामात कुचराई करणे भोवलेअमरावती : भाजीबाजार झोन क्रमांक ५ च्या सहायक आयुक्त सुषमा मकेश्वर यांचे मंगळवारी ‘आॅन दी स्पॉट’ निलंबन करण्यात आले. महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार हे सकाळी झोन कार्यालयात दौऱ्यावर गेले असता त्यांनी जागेवरच निलंबनाचे आदेश दिल्याची माहिती आहे.आयुक्त गुडेवारांनी मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास भाजीबाजार येथील झोन कार्यालय गाठले. ते कार्यालयात पोहोचताच अधिकारी, कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. त्यानंतर आयुक्तांनी सहायक आयुक्त सुषमा मकेश्वर यांचा वर्ग घेण्यास प्रारंभ केला. मालमत्ताकराची वसुली, शासन अनुदानातील शौचालय निर्मिती, प्रभागनिहाय स्वच्छतेचा लेखाजोखा तपासला तेव्हा आयुक्त गुडेवार यांचा पारा चढला. सहायक आयुक्त पदावर काम करताना नियम, कायद्याचे ज्ञान आहे की नाही, अशी विचारणा त्यांनी सहायक आयुक्त मकेश्वर यांना केली. यावेळी मकेश्वरांनी आयुक्त गुडेवारांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर दिले नाही. याउलट आयुक्त गुडेवार यांच्याशी सुषमा मकेश्वर यांनी शाब्दिक वाद घातला. त्यामुळे आयुक्त गुडेवार आणखीच चिडले. त्यानंतर आयुक्तांनी नगरसचिव मदन तांबेकर यांच्याशी संवाद साधून सुषमा मकेश्वर यांच्या निलंबनाचे आदेश काढण्याचे निर्देश दिलेत. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने आयुक्तांच्या आदेशान्वये महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७३ चे नियम ३(१),(२),(३) चे उल्लघंन करणारी बाब असल्याचे म्हटले आहे. तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम ४ च्या पोटकलम (१) अ अन्वये महाराष्ट्र महापालिका अधिनियम (५६) २ नुसार सहायक आयुक्त सुषमा मकेश्वर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबनाचे आदेश हे मकेश्वर यांना देण्यात आले असून निलंबन काळातील मुख्यालय महापालिका सामान्य प्रशासन विभाग हे ठेवण्यात आले आहे. या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.सुषमा मकेश्वर ‘नॉट रिचेबल’सहायक आयुक्त सुषमा मकेश्वर यांच्या निलंबनानंतर त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्या उपलब्ध झाल्या नाहीत. त्यांचा मोबाईल सतत ‘नॉट रिचेबल’ होता. ‘आॅन दी स्पॉट’ निलंबनामुळे अन्य अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. मकेश्वर यांचा प्रभार वरिष्ठ लिपिक प्रवीण इंगोले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.मकेश्वर शासनाच्या द्वितीय श्रेणीच्या अधिकारीसहायक आयुक्त सुषमा मकेश्वर या शासनाच्या वर्ग-२ च्या अधिकारी आहेत. त्यांच्यावर आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली कशी? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. वर्ग-२ अधिकाऱ्यांची बदली, वेतनवाढ, स्थानांतरण यासर्व प्रक्रिया शासनस्तरावरून चालतात. तरीदेखील आयुक्तांनी कोणत्या अधिकारात त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली, हा गुंता कायम आहे.झोनमध्ये स्वच्छता व्यवस्था कुचकामी होती, तर शौचालय बांधकाम निर्मितीतही काहीच सुधारणा नव्हती. वारंवार सूचना, आदेश देऊनही काहीच बदल झाला नाही. अखेर माझ्या अधिकाराचा वापर करून ही कारवाई केली.- चंद्रकांत गुडेवार, आयुक्त, महापालिका.