शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळा, वसतिगृहांना विद्यार्थ्यांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 05:01 IST

आदिवासी विकास विभागाच्या शासकीय, अनुदानित आश्रमशाळा आणि वसतिगृहे, समाजकल्याण विभागाचे वसतिगृहे ही निवासी आहेत. एकूण ८९ संस्था कामकाजासाठी सज्ज आहेत. मात्र, ८७ संस्थांमध्ये एकही विद्यार्थी आला नाही. तिवसा येथील मुलींचे वसतिगृह आणि निंभोरा येथील गुणवंत वसतिगृह सुरू झाले तरी विद्यार्थिसंख्या माेजकी आहे. शाळेत पाठवू, पण संमतिपत्र देणार नाही, असा पालकांचा सूर आहे. जिल्ह्यात आश्रमशाळा, वसतिगृहांतील विद्यार्थिसंख्या २३३२८ आहे.

ठळक मुद्देपालकांमध्ये कोरोनाची भीती

  लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील ८९ आश्रमशाळा, वसतिगृहे सज्ज झाली आहेत. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे पालकांकडून संमतिपत्र देण्यास नकार असल्याने विद्यार्थ्यांची प्रतीक्षा कायम आहे. समाजकल्याणची दोन वसतिगृहे सुरू झाली असली तरी विद्यार्थिसंख्येचा मुद्दा पाठ सोडत नसल्याचे चित्र आहे.आदिवासी विकास विभागाच्या शासकीय, अनुदानित आश्रमशाळा आणि वसतिगृहे, समाजकल्याण विभागाचे वसतिगृहे ही निवासी आहेत. एकूण ८९ संस्था कामकाजासाठी सज्ज आहेत. मात्र, ८७ संस्थांमध्ये एकही विद्यार्थी आला नाही. तिवसा येथील मुलींचे वसतिगृह आणि निंभोरा येथील गुणवंत वसतिगृह सुरू झाले तरी विद्यार्थिसंख्या माेजकी आहे. शाळेत पाठवू, पण संमतिपत्र देणार नाही, असा पालकांचा सूर आहे. जिल्ह्यात आश्रमशाळा, वसतिगृहांतील विद्यार्थिसंख्या २३३२८ आहे. यातील ९० विद्यार्थी उपस्थित झाले. कोविड सेंटर म्हणून एकही आश्रमशाळा नाही, तर प्रशासनाने वसतिगृहे परत केली आहेत. आश्रमशाळांसमोर अशा आहेत अडचणीशासनाने मुलांना आश्रमशाळेत घेताना पालकांचे संमतिपत्र अनिवार्य केले आहे. पालक संमतिपत्रास राजी नाहीत. दुसरीकडे शासकीय, अनुदानित आश्रमशाळांना विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आहे. ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी शाळेत विद्यार्थी नाही, असे सर्वदूर चित्र आहे. जिल्ह्यात २०३३८ विद्यार्थी असताना एकही जण शाळेत आले नाही. त्यामुळे आश्रमशाळांपुढे अडचणीत वाढ झाली आहे.

निवासी शाळांना विद्यार्थ्यांची प्रतीक्षाआदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या आश्रमशाळा, वसतिगृहे आहेत. या सर्व निवासी संस्था असून, २३ हजार ३२८ विद्यार्थी आहेत. ८९ पैकी एकही संस्था कोविड सेंटर नाही. वसतिगृहे, आश्रमशाळांना विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आहे.

२४ वसतिगृहांपैकी दोन सुरू झाले. २९९० पैकी केवळ ९० विद्यार्थी उपस्थित झाले. नव्याने शासन गाईडलाईन नाही. कोरोना नियमावलींचे पालन करूनच प्रवेश देण्यात आला आहे. शाळांचे सॅनिटायझेशन, विद्यार्थी सुरक्षितता, मास्कचा वापर बंधनकारक आहे.- विजय साळवे, उपायुक्त, समाजकल्याण अमरावती.

 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी