आश्रमशाळा, वसतिगृहांना विद्यार्थ्यांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 05:01 IST2020-12-21T05:00:00+5:302020-12-21T05:01:02+5:30

आदिवासी विकास विभागाच्या शासकीय, अनुदानित आश्रमशाळा आणि वसतिगृहे, समाजकल्याण विभागाचे वसतिगृहे ही निवासी आहेत. एकूण ८९ संस्था कामकाजासाठी सज्ज आहेत. मात्र, ८७ संस्थांमध्ये एकही विद्यार्थी आला नाही. तिवसा येथील मुलींचे वसतिगृह आणि निंभोरा येथील गुणवंत वसतिगृह सुरू झाले तरी विद्यार्थिसंख्या माेजकी आहे. शाळेत पाठवू, पण संमतिपत्र देणार नाही, असा पालकांचा सूर आहे. जिल्ह्यात आश्रमशाळा, वसतिगृहांतील विद्यार्थिसंख्या २३३२८ आहे.

Ashram schools, hostels waiting for students | आश्रमशाळा, वसतिगृहांना विद्यार्थ्यांची प्रतीक्षा

आश्रमशाळा, वसतिगृहांना विद्यार्थ्यांची प्रतीक्षा

ठळक मुद्देपालकांमध्ये कोरोनाची भीती

  लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील ८९ आश्रमशाळा, वसतिगृहे सज्ज झाली आहेत. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे पालकांकडून संमतिपत्र देण्यास नकार असल्याने विद्यार्थ्यांची प्रतीक्षा कायम आहे. समाजकल्याणची दोन वसतिगृहे सुरू झाली असली तरी विद्यार्थिसंख्येचा मुद्दा पाठ सोडत नसल्याचे चित्र आहे.
आदिवासी विकास विभागाच्या शासकीय, अनुदानित आश्रमशाळा आणि वसतिगृहे, समाजकल्याण विभागाचे वसतिगृहे ही निवासी आहेत. एकूण ८९ संस्था कामकाजासाठी सज्ज आहेत. मात्र, ८७ संस्थांमध्ये एकही विद्यार्थी आला नाही. तिवसा येथील मुलींचे वसतिगृह आणि निंभोरा येथील गुणवंत वसतिगृह सुरू झाले तरी विद्यार्थिसंख्या माेजकी आहे. शाळेत पाठवू, पण संमतिपत्र देणार नाही, असा पालकांचा सूर आहे. जिल्ह्यात आश्रमशाळा, वसतिगृहांतील विद्यार्थिसंख्या २३३२८ आहे. यातील ९० विद्यार्थी उपस्थित झाले. कोविड सेंटर म्हणून एकही आश्रमशाळा नाही, तर प्रशासनाने वसतिगृहे परत केली आहेत. 
आश्रमशाळांसमोर अशा आहेत अडचणी
शासनाने मुलांना आश्रमशाळेत घेताना पालकांचे संमतिपत्र अनिवार्य केले आहे. पालक संमतिपत्रास राजी नाहीत. दुसरीकडे शासकीय, अनुदानित आश्रमशाळांना विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आहे. ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी शाळेत विद्यार्थी नाही, असे सर्वदूर चित्र आहे. जिल्ह्यात २०३३८ विद्यार्थी असताना एकही जण शाळेत आले नाही. त्यामुळे आश्रमशाळांपुढे अडचणीत वाढ झाली आहे.

निवासी शाळांना विद्यार्थ्यांची प्रतीक्षा
आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या आश्रमशाळा, वसतिगृहे आहेत. या सर्व निवासी संस्था असून, २३ हजार ३२८ विद्यार्थी आहेत. ८९ पैकी एकही संस्था कोविड सेंटर नाही. वसतिगृहे, आश्रमशाळांना विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आहे.

२४ वसतिगृहांपैकी दोन सुरू झाले. २९९० पैकी केवळ ९० विद्यार्थी उपस्थित झाले. नव्याने शासन गाईडलाईन नाही. कोरोना नियमावलींचे पालन करूनच प्रवेश देण्यात आला आहे. शाळांचे सॅनिटायझेशन, विद्यार्थी सुरक्षितता, मास्कचा वापर बंधनकारक आहे.
- विजय साळवे, 
उपायुक्त, समाजकल्याण अमरावती.

 

Web Title: Ashram schools, hostels waiting for students