शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

सेनेतील एकदिली आश्‍चर्यकारक

By admin | Updated: May 17, 2014 23:13 IST

आमदार रवी राणा यांच्या पत्नी खासदार झाल्यात तर आपल्या अस्तित्त्वाचाच प्रश्न उभा ठाकेल, अशी सुप्त भिती प्रत्येकच आमदाराच्या मनात डोकावू लागली होती. राणा यांच्या राजकीय उंचीचा चढता

अमरावती : आमदार रवी राणा यांच्या पत्नी खासदार झाल्यात तर आपल्या अस्तित्त्वाचाच प्रश्न उभा ठाकेल, अशी  सुप्त भिती प्रत्येकच आमदाराच्या मनात डोकावू लागली होती. राणा यांच्या राजकीय उंचीचा चढता आलेख ज्या  वेगाने वाढत होता, ती गती बघून कुण्याही राजकीय नेत्याचे याबाबत दुमत नव्हते. खरे तर विधिमंडळातील  सहकारी या नात्याने राणा यांना सर्व सहा आमदारांशी विशेष जवळीक निर्माण करून परिपक्व राजकीय खेळी  खेळता आली असती; परंतु राणा यांनी ती संधी अडसुळांना उपलब्ध होऊ दिली. 
अमरावतीत वास्तव्य नसल्याची नाराजी सामान्यांमध्ये असली तरी आमदारांना विश्‍वासात घेऊन सामान्यांच्या त्या  नाराजीवर अडसुळांनी रामबाण उपाय खूप आधीच योजला होता. अब की बार, मोदी सरकार ही लाट होतीच.  अमरावतीतील मरगळेलल्या  भाजपक्षामध्ये या लाटेने कमालीचा उत्साह संचारला. तिकीट शिवसेनेच्या उमेदवाराला  मिळाले असा जराही भाव भाजपजनांमध्ये जाणवत नव्हता. जणू तिकीट भापलाच असावे, असा उत्साहाचा भर  भाजपमध्ये होता. संघाच्या पठडीत तयार झालेले मुरब्बी स्थानिक नेते कसोशीने कामाला लागले होते. मोदी यांनी  मंजूर केलेल्या सभांमध्ये अमरावतीचा नामोल्लेख पूर्वी नव्हताच. ऐनवेळी ती मिळविणे आणि मोदी खूश होतील अशी  गर्दी जमविणे हे दिव्य भाजपजनांनी तीन ते चार दिवसांत पार पाडले होते. संकल्पाच्या जोरावरच ते शक्य होऊ  शकले होते. मोदींनी अमरावतीच्या सभेत बाळासाहेबांचा आदरपूर्वक उल्लेख केल्यामुळे शिवसेनेत नवचैतन्य निर्माण  झाले. त्यानंतर अचानक शिवसेना ज्या एकदिलाने कामाला लागली, ते आश्‍चर्यच होते. उद्धव ठाकरे यांनी  अमरावतीत येऊन शिवसैनिकांकडून व्यक्त केलेल्या अपेक्षेचा मनापासून मान राखण्यात आला. अंतर्गत कलह  म्हणूनच शिवसैनिकांनी बाजूला सारला. 
मतदानाच्या दिवशी मतदारांची नावे गहाळ झाल्यामुळे उडालेला गोंधळ प्रवीण पोटे,  दिगंबर डहाके, सोमेश्‍वर  पुसतकर, किरण पातूरकर, संजय बंड, यांच्यासारख्या नेत्यांनी कौशल्याने हाताळला. जिल्हाधिकारी कार्यालयात  पोहोचून,  तक्रारींचे काय ते मग बघू. हाती आहे त्यातील अधिकाधिक मतदान कसे करवून घेता येईल यासाठी  फळी कामाला लाऊ, असा आग्रह या नेत्यांनी धरला. गोंधळी स्थितीमुळे मोठय़ा प्रमाणात होऊ शकणारी हानी  त्यामुळे मोठय़ा प्रमाणात  आटोक्यात आली. 
अडसूळ यांच्यावर दाखल झालेले गुन्हे, स्त्रिचारित्र्याच्या मुद्यावरून त्यांची झालेली कोंडी, बाहेरचे पार्सल असा  विरोधकांनी ताकदीने केलेला प्रचार यापैकी कुठल्याही नकारात्मक मुद्यांचा स्वत:वर प्रभाव होऊ न देता  भाजप-सेनेच्या बहाद्दरांनी केलेल्या अथक परिश्रमाचा सुगंध आता दरवळतोय. अमरावतीकरांनी टाकलेल्या  विश्‍वासाचे आनंदराव सोने करतीलच, अशी अपेक्षा तमाम अमरावतीकरांना आहे.