कोरोनाग्रस्तांचे पुन्हा १० मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 05:00 AM2020-09-12T05:00:00+5:302020-09-12T05:00:32+5:30

अहवालानूसार मोगणा येथील ७५ वर्षीय पुरूष, सातुर्णा ६६ वर्षीय पुरुष, तिवसा ६५ वर्षीय पुरूष, परतवाडा ६४ वर्षीय पुरूष (जिल्हा रूग्णालयात दाखल), ब्राम्हणवाडा थडी ७० वर्षीय पुरूष, जोगळेकर प्लॉट ५१ वर्षीय पुरूष, जवाहरगेट ६८ वर्षीय पुरूष, विलासनगरातील ५१ वर्षीय पुरूष, शिरजगाव कसबा ५६ वर्षीय पुरुष, मोबीन पुरा ७० वर्षीय पुरूष आदी कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे.

Another 10 deaths from coronavirus | कोरोनाग्रस्तांचे पुन्हा १० मृत्यू

कोरोनाग्रस्तांचे पुन्हा १० मृत्यू

Next
ठळक मुद्देआतापर्यंत १९१ : दिवसभरात १८८ अहवाल पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात २४ तासांत १० कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कोरोनाग्रस्त मृतांची संख्या १९१ वर पोहोचली आहे. दोन दिवसांत तब्बल २२ संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्याची चिंता वाढली आहे. दरम्यान शुकवारी १८८ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ७९९३ वर पोहोचली आहे.
अहवालानूसार मोगणा येथील ७५ वर्षीय पुरूष, सातुर्णा ६६ वर्षीय पुरुष, तिवसा ६५ वर्षीय पुरूष, परतवाडा ६४ वर्षीय पुरूष (जिल्हा रूग्णालयात दाखल), ब्राम्हणवाडा थडी ७० वर्षीय पुरूष, जोगळेकर प्लॉट ५१ वर्षीय पुरूष, जवाहरगेट ६८ वर्षीय पुरूष, विलासनगरातील ५१ वर्षीय पुरूष, शिरजगाव कसबा ५६ वर्षीय पुरुष, मोबीन पुरा ७० वर्षीय पुरूष आदी कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे.
जिल्ह्यात आतापर्यत ६०३६ रुग्णांना उपचारानंतर बरे वाटल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे सद्यस्थितीत १३६८ रुग्णांवर उपचार सुरुआहे. या आठवडात मृत्यू झालेल्या सहा रुग्णांचा तपशील जिल्हा श्ल्य चिकित्सक कार्यालयाने उपलब्ध केला नसल्याचे सांगण्यात आले.

कोरोना; जिल्हा स्थिती
जिल्ह्यात शुक्रवारी ९५५ संशयीत रुग्णांची तपासणी करण्यात येवून नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहे. आतापर्यत ६५,८७८ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यापैकी ५५,६६५ संशयीतांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. यापैकी ४५६,७६१ नमुने निगेटिव्ह आले आहे.

Web Title: Another 10 deaths from coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.