शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीच्या युवकाची रामगावात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:09 IST

नांदगाव पेठ/ अमरावती : नजीकच्या रामगाव ते टाकळी मार्गावर एका युवकाने कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी ...

नांदगाव पेठ/ अमरावती : नजीकच्या रामगाव ते टाकळी मार्गावर एका युवकाने कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी पहाटे सहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. अनुभव अरुण धाकडे (३२, रा. मातोश्री रमाबाई आंबेडकरनगर, अमरावती) असे मृताचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, प्रेयसीने अन्य व्यक्तीशी साखरपुडा केल्याने, आपण आत्महत्या करीत असल्याची सुसाईड नोट त्याचेजवळ मिळाल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.

मंगळवारी सकाळी ६ च्या सुमारास काही शेतकरी शेतात जात असताना रामगाव ते टाकळी मार्गावरील एका कडुनिंबाच्या झाडाला एक युवक लटकलेल्या अवस्थेत दिसला. घटनास्थळावरील नागरिकांनी नांदगाव पेठ पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

अनुभव धाकडे हा सोमवार रात्रीपासून तो घरून बेपत्ता होता. तो रामगावला कोणत्या उद्देशाने आला व आत्महत्येचे पाऊल का उचलले, याबाबत अनेक चर्चा झडल्या. गाडगेनगर पोलीस ठाण्यात अनुभव याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल होता, अशी माहितीदेखील मिळाली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली तथा शव उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. घटनेबाबत कुटुंबीयांना माहिती मिळताच त्यांनी एकच आक्रोश केला.