अमरावती विभाग राज्यात तिसऱ्या स्थानी, ९०.९२ टक्के निकाल ; विभागात कोणता जिल्हा अव्वल ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 16:21 IST2026-05-02T16:19:58+5:302026-05-02T16:21:23+5:30

Amravati : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता बारावीचा निकालात अमरावती विभागाचा निकाल ९०.९२ टक्के लागला आहे. राज्यात यंदा अमरावती विभाग तिसऱ्या स्थानी राहिला आहे तर उत्तीर्णतेच्या टक्केवारीत अमरावती विभागातून बुलढाणा जिल्हा अव्वल स्थानी आहे.

Amravati division ranks third in the state, 90.92 percent results; Which district is the top in the division? | अमरावती विभाग राज्यात तिसऱ्या स्थानी, ९०.९२ टक्के निकाल ; विभागात कोणता जिल्हा अव्वल ?

Amravati division ranks third in the state, 90.92 percent results; Which district is the top in the division?

अमरावती : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता बारावीचा निकालात अमरावती विभागाचा निकाल ९०.९२ टक्के लागला आहे. राज्यात यंदा अमरावती विभाग तिसऱ्या स्थानी राहिला आहे तर उत्तीर्णतेच्या टक्केवारीत अमरावती विभागातून बुलढाणा जिल्हा अव्वल स्थानी आहे. गेल्या वर्षी अमरावती विभागाचा निकाल ९१.४३ टक्के लागला होता. यंदा अर्धा टक्क्याने निकाल घटला आहे.

विभागातील टक्केवारीत विभागात बुलढाणा जिल्ह्याने अव्वल स्थान मिळवले असून या जिल्ह्याचा निकाल ९५.२२ टक्के लागला आहे. वाशिम ९१.१५, अकोला ९०.१४, यवतमाळ ८९.६९ टक्के तर अमरावती जिल्ह्याचा ८८.२६ टक्के इतका लागला आहे. बारावीच्या परीक्षेसाठी अमरावती विभागातून एकूण १ लाख ४८ हजार ९३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात एक लाख ४७ हजार ७५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात एकूण एक लाख ३४ हजार ३५२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी ९०.९२ टक्के इतकी आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकालाची टक्केवारी घसरली आहे. मात्र, राज्यात अमरावती विभाग हा तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. गतवर्षी अमरावती विभाग सहाव्या स्थानी होता.

विभागात यंदाही मुलींचीच बाजी

दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावीच्या निकालात अमरावती विभागातून मुलींनी बाजी मारली आहे. विभागातून एकूण ६८ हजार ८४४ मुलींनी परीक्षा दिली. त्यापैकी ६४ हजार ३८१ मुली उत्तीर्ण झाल्या असून निकालाची टक्केवारी ही ९३.९५ टक्के इतकी आहे. विभागातून ७८ हजार ९१० मुलांनी परीक्षा दिली. त्यापैकी ६९ हजार ६७१ उत्तीर्ण झाले असून टक्केवारी ही ८८.२९ टक्के इतकी आहे.

Web Title : अमरावती विभाग राज्य में तीसरे स्थान पर; कौन सा जिला शीर्ष पर?

Web Summary : अमरावती विभाग ने 90.92% परिणामों के साथ महाराष्ट्र में तीसरा स्थान प्राप्त किया। बुलढाणा जिला 95.22% के साथ शीर्ष पर रहा। लड़कियों ने लड़कों से बेहतर प्रदर्शन किया। पिछले वर्ष की तुलना में उत्तीर्ण प्रतिशत में थोड़ी गिरावट आई।

Web Title : Amravati Division Third in State; Which District Topped?

Web Summary : Amravati division secured third rank in Maharashtra with 90.92% results. Buldhana district topped the division with 95.22%. Girls outperformed boys. Overall pass percentage decreased slightly compared to last year.