शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिकेचे दर निश्चित, जादा आकारल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 05:00 IST

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे रुग्णांची ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिका रास्त दरात उपलब्ध असावी यासाठी प्राधिकरणाकडून दर निश्चित करण्यात आले. प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, सहायक वाहतूक पोलीस आयुक्त किशोर सूर्यवंशी व सदस्य सचिव प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गित्ते यांच्या समितीने हा निर्णय घेतला.

ठळक मुद्देदरपत्रक रुग्णवाहिकेच्या आत लावणे बंधनकारक : जिल्हाधिकारी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती  : जिल्ह्यात कोविड साथ पाहता रुग्णवाहिकांची मागणी वाढली आहे. रुग्णवाहिकांधारकाकडून अवाजवी दर आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून रुग्णवाहिकेचे अधिकृत दर जाहीर करण्यात आलेले आहे.  त्यापेक्षा अधिक दर आकारल्यास रुग्णवाहिकाधारकावर दंडात्मक कारवाईसह फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी दिला.कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे रुग्णांची ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिका रास्त दरात उपलब्ध असावी यासाठी प्राधिकरणाकडून दर निश्चित करण्यात आले. प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, सहायक वाहतूक पोलीस आयुक्त किशोर सूर्यवंशी व सदस्य सचिव प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गित्ते यांच्या समितीने हा निर्णय घेतला.वाहनात नोंदवही ठेवणे आवश्यक असून, त्यात रुग्णांचे नाव, पत्ता, तारीख, आकारलेले भाडे व रुग्णासोबतच्या व्यक्तीची नाव, पत्ता व सही असणे आवश्यक आहे. वाहन यांत्रिकदृष्ट्या सुरक्षित व स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी मालकाची असेल. प्राधिकरणाने निश्चित केलेल्या भाड्यात चालकाचा पगार व इंधन   खर्च समाविष्ट आहे. जादा दर आकारणाऱ्या वाहनधारकावर प्रथम गुन्ह्यासाठी ५ हजार रुपये दंड, दुसऱ्या गुन्ह्यासाठी २० हजार रुपये दंड व तिसऱ्या गुन्ह्यासाठी फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. कुणाही रुग्णवाहिकाधारकाने जादा दर आकारल्यास तत्काळ आरटीओ कार्यालयाकडे तक्रार नोंदविण्याचे आवाहन आहे. 

रुग्णवाहिकेच्या प्रकारानुसार भाडे दर- मारुती व्हॅन रुग्णवाहिकेसाठी प्रथम २५ किलोमीटरसाठी ८०० रुपये व त्यापुढील प्रत्येक किमीसाठी १५ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे.- टाटा सुमो व मेटॅडोरसदृश वाहिकेसाठी प्रथम २५ किमीसाठी ९०० रुपये व त्यापुढे प्रति किमी १५ रुपये दर राहील. - टाटा ४०७ स्वराज माझदा आदी वाहनांत बांधणी केलेल्या रुग्णवाहिकेचे दर प्रथम २५ किमीसाठी १२०० रुपये व त्यापुढे प्रति किमी १८ रुपये राहील.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या