शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

१२ वर्षांनंतरही उपजिल्हा रुग्णालयाची समस्या कायम

By admin | Updated: June 21, 2016 00:15 IST

उपजिल्हा रुग्णालय स्थापन होऊन एक तपापेक्षा अधिक दिवस उलटल्यावरही रुग्णांच्या गैरसोईचा पाढा सुरूच आहे.

रुग्ण त्रासले : उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार अंदाधुंद

सुनील देशपांडे अचलपूरउपजिल्हा रुग्णालय स्थापन होऊन एक तपापेक्षा अधिक दिवस उलटल्यावरही रुग्णांच्या गैरसोईचा पाढा सुरूच आहे. या दवाखान्याचा अंदाधुंद कारभार पाहता याला कुणी वाली आहे की नाही, असा प्रश्न जनतेत निर्माण झाला आहे. अचलपूर तालुक्यातील जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी तत्कालीन पालकमंत्री वसुधाताई देशमुख यांच्या प्रयत्नाने जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने, महाराष्ट्र आरोग्य सेवा विकास प्रकल्प कार्यक्रम अंतर्गत २००३ मध्ये अचलपूर येथे उपजिल्हा रुग्णालय बांधण्यात आले. या दवाखान्याचे उद्घाटन १२ सप्टेंबर २००३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते व तत्कालीन आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांचे अध्यक्षतेखाली झाले होते. प्रमुख उपस्थिती वसुधाताई व तत्कालीन नगराध्यक्ष हाजी मो.रफीक शेख गुलाब, प्रकल्प आयुक्त रमेशचंद्र कानडे, महासंचालक, आरोग्य संचालनालय डॉ.सुभाष यांची उपस्थिती होती. मागील तीन वर्षांपासून तर या रुग्णालयात अंदाधुंद कारभार सुरू असल्याने रुग्णांचे हाल होत आहे. वैद्यकीय अधीक्षक मो.जाकीर यांचे उपजिल्हा रुग्णालयाकडे दुर्लक्ष होत असल्याने अस्वच्छता, परिचारीकांचा व कर्मचाऱ्यांचा रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक, दवाखान्यातील व परिसरातील असलेले घाणीचे साम्राज्य औषधांचा तुटवडा अशा प्राथमिक समस्याही सुटलेल्या नसून वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही मनमानी वाढली आहे. कार्यमुक्त केल्याने ड्युटीचा प्रश्नअगोदरच येथील दवाखान्यात परिचारिकांची कमतरता आहे. त्यात काही परिचारिकांची बाहेरगावी बदली झाली आहे. बदली झालेल्या परिचारिकांना अधिपरिचारिकांची व्यवस्थापन अधिकारी डॉ.मेराज अली व मेटू यांना अंधारात ठेवून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कार्यमुक्त केल्याने त्यांच्या ड्युटी कशा लावाव्यात, हा प्रश्न त्यांना निर्माण होतो अशी माहिती आहे.बगिच्याचा एका बाजूला ते टाके असून तेथे सांडपाणी व टाक्याचे पाणी आहे. त्यातील पाण्याची कायमची विल्हेवाट लागावी, यासाठी आरोग्य मंत्र्यांकडे निधीचा प्रस्ताव पाठवला आहे. तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागालाही पत्र दिले आहे. परिचारिकांना आरोग्य संचालकांच्या आदेशाने कार्यमुक्त केले आहे. मी वेळोवेळी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेत असतो. मनाने कोणताच निर्णय घेत नाही.- मो.जाकीर,वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय