शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

अडसूळ, बुंदिले कोट्यधीश उमेदवार

By admin | Updated: October 6, 2014 23:06 IST

दर्यापूर मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार अभिजित अडसूळ आणि भाजपचे उमेदवार रमेश बुंदिले करोडपती तर मनसेचे गोपाल चंदन भारिप-बमसंच्या उमेदवार उज्ज्वला वानखडे व राष्ट्रवादीचे उमेदवार दिनेश बूब

दर्यापूर : दर्यापूर मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार अभिजित अडसूळ आणि भाजपचे उमेदवार रमेश बुंदिले करोडपती तर मनसेचे गोपाल चंदन भारिप-बमसंच्या उमेदवार उज्ज्वला वानखडे व राष्ट्रवादीचे उमेदवार दिनेश बूब लाखांचे धनी आहेत. शिवसेनेच्या तिकिटावर दुसऱ्यांदा निवडणूक लढविणारे अभिजित अडसूळ यांच्याकडे १ लाख ४५ हजारांची रोकड असून ४४ लाख ३७ हजार १३७ रूपये व पत्नीच्या नावे १८ लाख ५७ हजार ७७२ रुपयांची बँकेत ठेवी आहे. अडसूळ यांची ३ लाख ५३ हजार ७३५ रुपयांची शेअर्समध्ये गुंतवणूक असून राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राद्वारे त्यांनी १ कोटी ८२ लाख रूपयांची गुंतवणूक केली आहे. अडसूळ यांचा मुंबई येथील कांदिवली येथे ४७० चौरस फुटाचा फ्लॅट असून वावलेगाव येथे ४ हजार ८८ चौरस फुटांचा प्लॉट आहे. भाजपचे उमेदवार रमेश बुंदिले हेसुद्धा कोट्यधीश आहेत. त्यांच्याजवळ १ कोटी ५ लाख ६७ हजारांची जंगम तर ७८ लाख ८० हजारांची स्थावर मालमत्ता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार गोपाल चंदन यांच्याकडे २ लाखांची रोकड असून १६ लाख ४० हजारांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे २ लाख ८० हजारांची संपत्ती आहे. चंदन यांच्याकडे १० एकर ३० गुंठे शेती आणि अकोला येथे भूखंड असल्याचे त्यांनी दिलेल्या संपत्तीच्या विवरणात नमूद आहे.भारिप-बमसंच्या उमेदवार उज्ज्वला वानखडे यांच्याकडे ५ लाख रूपये रोख तर पतीजवळ २ लाख ५० हजार रूपये आहेत. त्यांच्याकडे ११ लाख १३ हजार रूपयांचे सोने तर ४३ हजार रूपयांची चांदी असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिनेश बूब यांच्याकडे १ लाख २७ हजार ११५ रूपये व पत्नीकडे ५२ हजारांची रोकड आहे. त्याचप्रमाणे बूब यांच्याकडे ३ लाख ५० हजारांचे सोने तर पत्नीकडे ५ लाख ५० हजारांचे सोने आहे. दिनेश बूब यांच्या नावावर ५ लाख ४७ हजार ५५७ तर पत्नीच्या नावावर १ लाख ४४ हजारांची स्थावर मालमत्ता आहे.