शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींवर प्रशासकराज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2022 05:01 IST

ओबीसींच्या आरक्षणाशिवाय निवडणूक नाही, ही भूमिका राज्य शासनाने घेतली व महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती केली आहे. याशिवाय आयोगाकडे सुपूर्द करण्यात आलेले निवडणुकीसंदर्भातील काही अधिकार शासनाकडे परत घेतले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणुकीतदेखील ओबीसी आरक्षणाचा तूर्तास न संपणारा घोळ  असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम वाढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषद, दहा पंचायत समित्या व महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडली व प्रशासकांची नियुक्ती झाली. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांबाबत नागरिकांमध्ये संभ्रम वाढला आहे. जिल्ह्यात सध्या २७० ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेवरील हरकतींवर सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची निवडणूक लांबणीवर पडल्यास प्रशासकाची नियुक्ती होणार का, याबाबतची चर्चा ग्रामीण भागात रंगली आहे.राज्य निवडणूक आयोगाच्या २७ जानेवारीच्या आदेशान्वये जिल्ह्यात सध्या २७० ग्रामपंचायतींची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली व ४ मार्चपर्यंत हरकती व सूचना दाखल करण्यात आल्या आहेत. यावर १५ मार्चला उपविभागीय अधिकाऱ्यांसमक्ष सुनावणी घेण्यात येणार आहे. २९ मार्चला जिल्हाधिकारी अंतिम प्रभागरचना जाहीर करणार आहेत. आठवड्यात ज्या पद्धतीने घडामोडी झाल्यात, विधेयक पारित झाले, ओबीसींच्या आरक्षणाशिवाय निवडणूक नाही, ही भूमिका राज्य शासनाने घेतली व महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती केली आहे. याशिवाय आयोगाकडे सुपूर्द करण्यात आलेले निवडणुकीसंदर्भातील काही अधिकार शासनाकडे परत घेतले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत निवडणुकीतदेखील ओबीसी आरक्षणाचा तूर्तास न संपणारा घोळ  असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम वाढला आहे.

इच्छुकांच्या तयारीवर फेरले पाणीजिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांनी चांगलीच मोर्चेबांधणी केली होती. या तयारीवर आता पाणी फेरले गेले आहे. ग्रामपंचायतीसाठी आयोग किंवा ग्रामविकास विभागाकडून सध्या तरी काही आदेश नाहीत. मात्र, निवडणूक लांबणीवर पडल्यास गावपातळीवरील इच्छुकांना पुन्हा काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्याजिल्ह्यात जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या २७० ग्रामपंचायती आहेत. यामध्ये अमरावती तालुक्यात १३, भातकुली १२, तिवसा १६, अचलपूर २३, चांदूरबाजार २५, दर्यापूर २४, अंजनगाव १३, मोर्शी २४, वरूड २३, चांदूर रेल्वे २८, धामणगाव रेल्वे ७, नांदगाव खंडेश्वर १७, धारणी २६ व चिखलदरा तालुक्यात २९ ग्रामपंचायती आहेत.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतOBC Reservationओबीसी आरक्षण