शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
2
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
3
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
4
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
5
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
6
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
7
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
8
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
9
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
10
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
11
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
12
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
13
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
14
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
15
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
20
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

मतमोजणीसाठी प्रशासनाची लगीनघाई

By admin | Updated: May 9, 2014 01:03 IST

नुकतीच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या जिल्हय़ाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाकडूनही मतमोजणीसाठीची तयारी सुरु असून आवश्यक ..

अमरावती : नुकतीच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या जिल्हय़ाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाकडूनही मतमोजणीसाठीची तयारी सुरु असून आवश्यक मनुष्यबळ व इतर कामाचे नियोजन सुरू असल्याचे निवडणूक विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या मतदानापासून तब्बल ३५ दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर येत्या १६ मे रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी बडनेरा मार्गावरील नेमानी गोडाऊन येथे सकाळी आठ वाजतापासून होणार आहे. मागील वेळेपेक्षा यावेळी लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी बर्‍यापैकी वाढली आहे. यावेळी साधारणपणे १0 लाखांहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. लोकसभा निवडणुका एकूण १९ उमेदवार रिंगणात होते. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जिल्हा निवडणूक विभागाने प्राथमिक यादी तयार केली आहे. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी पारदर्शकपणे होऊन याला लागणारा वेळ टळावा, यासाठी नियोजनबद्धरित्या प्रशासकीय यंत्रणेकडून नियोजन सुरू आहे. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी करण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाने २0 टेबलवर मतमोजणी करण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे.