शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

झपाटलेल्या तरूणांनी हलविले प्रशासन

By admin | Updated: June 22, 2016 00:13 IST

तिवसा तालुक्यातील झपाटलेल्या तरूणांनी जीवावर उदार होऊन तीन दिवस अहोरात्र जे परिश्रम उपसले त्यामुळेच ....

सत्याचा आग्रह : सलग तीन रात्री केले पुरावे गोळाअमरावती : तिवसा तालुक्यातील झपाटलेल्या तरूणांनी जीवावर उदार होऊन तीन दिवस अहोरात्र जे परिश्रम उपसले त्यामुळेच अवैध रेती वाहतुकीवर जिल्हा प्रशासनाला नाईलाजाने कारवाई करावी लागली. तिवसा तालुक्यातून रात्रभर रेतीचे अनेक ट्रक नियमबाह्यरीत्या धावत असतात. नागपूर-अमरावती महामार्गावरून या मालमोटारींचे आवागमन असते. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हिच स्थिती आहे. सर्वत्र रेती घाटावरून रात्रीचा मनसोक्त रेती उपसा केला जात असताना तिवसा तालुक्यातील काही तरुणांनी मात्र त्यांच्या परिसरातील हा अवैध आणि जीवघेणा व्यापार रोखण्याचे मनी ठाणले. छत्रपती संघटनेचे वैभव वानखडे आणि त्यांच्या तमाम मित्र मंडळींनी अवैध रेती व्यवसायाचे पुरावेच गोळा करण्याचे ठरविले. तीन रात्री डोळ्यात अंजन घालून मोबाईलमध्ये या तरूणांनी व्हिडीओ शूटिंग आणि छायाचित्रीकरण केले. वॉट्सअ‍ॅपवरील ज्या एका ग्रुपवर जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, लोकप्रतिनिधी आणि पत्रकार यांचा सहभाग आहे, त्या ग्रुपवर या तरुणांनी अवैध रेती वाहतुकीचे पुरावे अपलोड केले. आक्रमक चर्चा ग्रुपवर सुरू झाली. रात्री दोन वाजता पकडलेला ट्रक असो वा पहाटे ४ वाजता - लगेच व्हीडीओ वा फोटो अपलोड झालेच म्हणून समजा. तरुणांनी सत्यासाठी पुराव्यानिशी धरलेला आग्रह अखेर परिणामकारक ठरला. जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांना उशीरा आणि नाईलाजाने का होईना, कारवाईचे आदेश द्यावे लागले. दोन रात्री वाळू माफीयांशी एकाकी झुंज देणाऱ्या तरुणांच्या मदतीला निगरगट्ट तहसीलदार आणि त्यांची चमू हजर झाली. खरे तर भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्या या तरुणांची दखल पहिल्याच दिवशी घ्यायला हवी होती. परंतु प्रशासनाने त्यातही संधी शोधण्याचा प्रयत्न केला. ध्येयाने पेटलेल्या तरुणांच्या इराद्यात बदल होत नसल्याचे बघून जिल्हा प्रशासन नमले. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले कारवाईचे आदेश खरे तर तिवस्यातील वैभव वानखडे आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या लढ्याचेच यश होय.