शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
3
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
4
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
5
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
6
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
7
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
8
Top Marathi News LIVE Updates: १ मेपासून मराठीची मोहीम सुरूच राहणार; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
9
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
10
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
11
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
12
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
13
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
14
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
15
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
16
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
17
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
18
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
19
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
20
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅलेंटाईन“डे‘ला एका प्रेमीयुगुलावर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:13 IST

अमरावती : शहर पोलिसांनी ठिकठिकाणी फिक्स पॉइंट लावून कडक बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे छत्री तलाव, शिवटेकडी व विविध बगीच्यात ...

अमरावती : शहर पोलिसांनी ठिकठिकाणी फिक्स पॉइंट लावून कडक बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे छत्री तलाव, शिवटेकडी व विविध बगीच्यात तरुणाई रविवारी फिरकलीच नाही. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तरूणाईने व्हॅलेंटाईन डे साजरा केला. फ्रेजरपुरा ठाणे हद्दीत मात्र, एका प्रेमीयुगुलावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

सदर प्रेमीयुगुुलाला फ्रेजरपुरा ठाण्याच्या दामिनी पथकाने सोमेश्वर मंदिरातून ताब्यात घेतले. मंदिर परिसरात प्रेमीयुगुल चाळे करताना दामिनी पथकाला आढळून आले. त्यांच्यावर कलम ११० अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करून समज देऊन सोडण्यात आले. छत्री तलाव, प्रशांतनगर बगिच्या, मालटेकडी, वडाळी तलाव परिसरात पोलिसांनी गस्त केली. मात्र, त्यांना प्रेमीयुगुल आढळून आले नाही. पोलिसांनी तोंडाला मास्क न लावता फिरणाऱ्यांवरसुद्धा कारवाया केल्या. तसेच पाचपेक्षा अधिक नागरिक एका ठिकाणी वावरत असेल तर त्यांच्यावर भादंविचे कलम १८८ व अन्य कलमांतर्गत शहरात अनेक कारवाया करण्यात आल्या. मात्र, नेमक्या किती कारवाया झाल्या याची माहिती वृत्त लिहिस्तोेवर उपलब्ध होऊ शकली नाही. यासंदर्भात विशेष शाखेच्या पोलीस निरीक्षक नीलिमा आरज यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, होऊ शकला नाही.