शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

क्वॉलिटी मॉनिटरिंगसाठी शिकाऊ अभियंत्यांवर धुरा

By admin | Updated: May 26, 2015 00:12 IST

मागील पाच वर्षापासून कधी अवर्षण तर कधी अतिवृष्टी, यासोबतच आता दुष्काळ अशा कचाटयात अडकलेल्या ...

आज बैठक : जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांची करणार तपासणीअमरावती : मागील पाच वर्षापासून कधी अवर्षण तर कधी अतिवृष्टी, यासोबतच आता दुष्काळ अशा कचाटयात अडकलेल्या जिल्ह्याला टंचाईमुक्त करण्यासोबतच गाव तेथे जलयुक्त शिवार ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी २५३ गावाचा कोटी रूपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. दरम्यान या कोट्यवधी रूपयांच्या कामाची गुणवत्ताही राखली जावी, यासाठी या कामांचे मुल्यमापन महत्वपूर्ण ठरते. त्यासाठी शासकीय तंत्रनिकेतन आणी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्याची मदत घेतली जाणार आहे.जलयुक्त शिवार अभियानातील कामे गुणवत्ता पूर्ण व्हावीत, यासाठी प्राधान्याने हे अभियंते लक्ष ठेवणार आहेत. ठरावीक कालावधीनंतर या कामांच्या संदर्भातील अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केला जाणार आहे. जलयुक्त शिवार अभियानातील कामे विविध यंत्रणेच्या माध्यमातूनकेली जात आहे. ही कामे चांगल्या प्रतीची असावीत, अशा शासनाच्या सूचना आहेत. त्या दुष्टीने जलयुक्त शिवार अभियानाच्या आढावा दर आठवडयाला घेण्यात येत आहे. यामध्ये निवड पात्र गावात सुरू असलेल्या कामांचा आढावा कामांची स्थिती याबाबत माहिती घेऊन काही उणिवा आढळल्यास त्यामध्ये सुधारणा करणे व कामे ही वेळेत करण्याच्या दुष्टीने कामांची गती वाढविणे, यावर विशेष भर देत असतांनाच कामांची गुणवत्ता राखणे महत्वाचे आहे. परिणामी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी जलयुक्त शिवारच्या कामांची गुणवत्ता पडताळण्यासाठी शासकीय अभियांत्रीकी व तंत्रनिकेतनमधील विद्यार्थी तसेच तज्ञ प्राध्यापक यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक तालुक्यात दोन या प्रमाणे या अभियंत्यावर जबाबदारी दिली जाणार आहे. जिल्हा कायमस्वरूपी टंचाई मुक्त करणे, ही प्रशासनाची भूमिका आहे. ती या अभियानात नक्कीच प्रशासन पूर्ण करेल, यात शंका नाही, असा आशावाद जिल्हाधिकारी गित्ते यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)जलयुक्त शिवार अभियानातील कामांची गुणवत्ता चांगली असावी, यासाठी खास गुणवत्ता तपासणीसाठी शासकीय अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन शाखेच्या विद्यार्थ्याची मदत घेतली जाणार आहे. यासाठी मंगळवारी बैठक बोलाविली आहे.- किरण गीत्ते, जिल्हाधिकारी.