शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

अचलपूर मतदारसंघ 'हॉट' ठरणार; राज्याच्या राजकारण्यांचे लागले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 11:08 IST

Amravati : बच्चू कडू सलग पाचव्यांदा रिंगणात, दिव्यांगांच्या हक्काच्या नेतृत्वाचे आज नामांकन

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : सत्ता पक्षात असो वा विरोधात आमदार बच्चू कडू यांनी विधानसभेत शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, आबालवृद्ध, महिलांच्या हक्कासाठी कधीही तडजोड केली नाही. प्रसंगी थेट मुख्यमंत्र्यांशी भिडणारे बच्चू कडू हे अलीकडे वेगळेच रसायन ठरले आहे. त्यामुळे यंदा विधानसभा निवडणुकीत अचलपूर मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

दिव्यांगाच्या हक्काचा निधी स्थानिक स्वराज्य संस्था अथवा शासनाने त्यांच्यासाठी विविध योजना राबविण्यासाठी विधिमंडळात कायदे करणारा आमदार अशी बच्चू कडू यांची राज्याच्या इतिहासात नोंद घेण्यात आली. एवढेच नव्हे तर दिव्यांगासाठीचा निधी खर्च झाला अथवा नाही? याची शहानिशा करण्यासाठी थेट जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपलिकांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी करुन आढावा घेणारे आमदार बच्चू कडू ठरले. म्हणून राज्य सरकारने बच्चू कडू यांच्या मागणीनुसार राज्यात दिव्यांग विकास विभागाची निर्मिती केली. मात्र शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी आणि महिलांच्या प्रश्नांना राज्य सरकार बगल देत असल्याने संतप्त होऊन त्यांनी महायुतीच्या नेत्यांशी पंगा घेतला. आमदार बच्चू कडू यांनी राज्यात परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व करण्याचा निर्णय घेतला, हे विशेष. 

एवढेच नव्हे तर विधानसभेच्या अनेक जागांवर प्रहारचे उमेदवारदेखील उभे केले. त्यामुळे बच्चू कडू यांच्या राजकीय वाटचालीकडे महायुती वा महाविकास आघाडीचे लक्ष लागले आहे. ते अचलपूर मतदार संघातून तब्बल सहाव्यांदा नामांकन भरत असल्याने हा मतदारसंघ राज्यात राजकीयदृष्ट्या 'हॉट' ठरणार आहे.

प्रहारकडून सोमवारी उमेदवारी दाखल करणार प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आणि परिवर्तन महाशक्तीचे अचलपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे पाचव्यांदा हे सोमवारी, २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता महानामांकन रॅलीच्या माध्यमातून सलग सहाव्यांदा नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. सलग चार निवडणुकीत विजय मिळवून विक्रम प्रस्थापित करणारे हे पाचव्यांदा अचलपूर मतदारसंघात नव्या इतिहासाची नोंद करण्यासाठी बच्चू कडू यांनी सुक्ष्म रणनीती आखली आहे.

आईच्या स्मृती स्थळावर दर्शनानंतर रॅलीबच्चू कडू हे २८ ऑक्टोबर रोजी सकाळी सर्वप्रथम बेलोरा येथे गावी जाऊन आईच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर अचलपूर येथील गांधी पुलावरून निघणाऱ्या महानामांकन रॅलीत सहभागी होतील, नामांकन रॅलीसाठी गावा-गावातून हजारो शेतकरी, युवक, दिव्यांग आणि मातृशक्ती सहभागी होणार असून तसे नियोजन प्रहारने केले आहे. त्यांच्या नामांकनासाठी परिवर्तन महाशक्तीचे राजू शेट्टी आणि संभाजीराजे भोसले देखील येण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूAmravatiअमरावतीMaharajbagh Nagpurमहाराजबाग नागपूरachalpur-acअचलपूर