शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
3
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
4
"मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
5
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
6
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
7
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
8
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
9
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
10
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
12
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
13
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
15
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
16
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
17
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
18
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
20
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?

आतिषच्या वडिलांचा माफीनामा फसाटेंची सक्तीची रजा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 6:00 AM

मंगळवारी सकाळी अपघातात जखमी झालेल्या आतिषचा मृत्यू झाला. औषधोपचाराचा अभाव व डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळेच आतिषचा मृत्यू झाल्याच्या संशयावरून नातेवाईकांनी राऊन्डवर असलेल्या डॉ. शशिकांत फसाटे यांच्यावरच हात उगारला. नातेवाईक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागणीवरून जिल्हा शल्यचिकीत्सक श्यामसुंदर निकम यांनी डॉ. शशिकांत फसाटे यांना सक्तीच्या रजेवर पाठविल्याबद्दल पत्र काढले.

ठळक मुद्देसीएसच्या कक्षात बैठक : इर्विनमधील डॉक्टरचे हल्लाप्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टरवर झालेल्या मारहाण प्रकरणानंतर मृतक आतिष ईश्वर लोणारे याच्या वडिलांनी बुधवारी माफीनामा लिहून दिला. त्यामुळे जिल्हा शल्यचिकीत्सक श्यामसुंदर निकम यांनी वैद्यकीय अधिकारी शशिकांत फसाटे यांची सक्तीच्या रजेचा निर्णय रद्द केला.मंगळवारी सकाळी अपघातात जखमी झालेल्या आतिषचा मृत्यू झाला. औषधोपचाराचा अभाव व डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळेच आतिषचा मृत्यू झाल्याच्या संशयावरून नातेवाईकांनी राऊन्डवर असलेल्या डॉ. शशिकांत फसाटे यांच्यावरच हात उगारला. नातेवाईक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागणीवरून जिल्हा शल्यचिकीत्सक श्यामसुंदर निकम यांनी डॉ. शशिकांत फसाटे यांना सक्तीच्या रजेवर पाठविल्याबद्दल पत्र काढले. हे प्रकरण कोतवाली पोलिसांपर्यंत पोहोचले होते. दरम्यान घडलेल्या प्रकाराची खंत मृताच्या नातेवाईकांनी व्यक्त करून डॉ. फसाटे यांना माफी मागितली. त्यामुळे त्यांनीही नातेवाईकांच्या भावनांचा विचार करून पोलीस तक्रार दिली नाही. बुधवारी आतिषचे वडिल ईश्वर लोणारे यांनी जिल्हा शल्यचिकीत्सक श्यामसुंदर निकम यांची भेट घेऊन, त्यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली.नातेवाईकांनी भावनेच्या भरात चुक केल्याची कबुल करून डॉ. फसाटेंची सक्तीची रजा रद्द करण्याबाबत विनंती केली. यावेळी त्यांच्यासोबत मार्डीचे सरपंच हर्षल लोणारे उपस्थित होते. त्यांची विनंतीला मान देऊन सीएस यांनी डॉ. फसाटे यांच्या सक्तीच्या रजेचा निर्णय मागे घेतला. यावेळी इर्विन रुग्णालयातील बहुतांश वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.भावनेच्या भरात मृताच्या नातेवाईकांनी डॉक्टरवर हल्ला केला. याविषयी कायद्यात सात वर्षांच्या कठोर शिक्षेची तरतुद आहे. मात्र, त्या मुलांच्या भविष्यांचा विचार करता, तसेच माफी मागितल्याने आम्ही निर्णय मागे घेतला. डॉ. फसाटेंची सक्तीची रजा रद्द केली. ते पुन्हा सेवेत रुजू झाले आहे.- श्यामसुंदर निकम, शल्यचिकीत्सक, ईर्विन. 

टॅग्स :doctorडॉक्टर