शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागातून ८० वर्षे जुने ‘पीओआर’ होणार हद्दपार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2021 20:32 IST

forest department News : भारत स्वांतत्र्यापूर्वी सन १९४० पासून वनगुन्हे नोंदविण्याची ब्रिटिशकालीन पद्धत आहे. ती आजतागायत सुरू आहे. मात्र, या जुन्या पद्धतीमुळे वनगुन्ह्यांची सविस्तर माहिती ‘पीओआर’मध्ये नमूद करणे शक्य नव्हते.

- गणेश वासनिकअमरावती -राज्याच्या वन खात्यात ब्रिटिशकालीन ८० वर्षे जुने प्राथमिक वनगुन्हा रिपोर्ट (पीओआर) हद्दपार करण्यात आले आहे. आता पोलिसांच्या धर्तीवर वनगुन्हा नोंदविला जाणार असून, न्यायालयात वन गुन्ह्याप्रकरणी दोषींना कठोर शासन होईल, असे तीन पानांचे पीओआर असणार आहे.

भारत स्वांतत्र्यापूर्वी सन १९४० पासून वनगुन्हे नोंदविण्याची ब्रिटिशकालीन पद्धत आहे. ती आजतागायत सुरू आहे. मात्र, या जुन्या पद्धतीमुळे वनगुन्ह्यांची सविस्तर माहिती ‘पीओआर’मध्ये नमूद करणे शक्य नव्हते. त्यामुळे अनेक गंभीर स्वरुपाचे वनगुन्हे घडल्यानंतरही दोषी निर्दोष मुक्त होत असल्याचे अनेक प्रकरणातून समोर आले. परिणामी वनमंत्री संजय राठोड यांनी वन खात्यातील ‘पीओआर’मध्ये आमूलाग्र बदल केला आहे. पोलीस खात्याप्रमाणे गुन्ह्याच्या प्रथम अहवाल (एफआयआर) याप्रमाणे वनगुन्ह्याचा पीओआर असणार आहे. तोदेखील मराठीतून असेल. जंगलात वनकर्मचारी कर्तव्यावर असताना वनगुन्हा घडल्यास त्याला तीन पानांचा ‘पीओआर’ जारी करावा लागेल. यात झालेल्या एकूणच वनगुन्ह्यांची सविस्तर माहिती नमूद करावी लागणार आहे. चांद्यापासून तर बांध्यापर्यंत वनकर्मचाऱ्यांना नव्या पद्धतीने वनगुन्हा दाखल करावा लागणार आहे.

वनमंत्री, सचिवांनी घेतला आढावावन खात्यात नव्या पद्धतीने प्राथमिक वनगुन्हा रिपोर्ट (पीओआर) लागू करण्याच्या अनुषंगाने गत दोन दिवसांपूर्वी वनमंत्री संजय राठोड, वनविभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांनी आढावा घेतला. त्याअनुषंगाने वरिष्ठ वनाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. जुने ‘पीओआर’मध्ये आमूलाग्र बदल करून नव्याने तीन पानांच्या ‘पीओआर’नुसार अंमबजावणी करण्याविषयी शिक्कामोर्तब झाले. फेब्रुवारी अथवा मार्च २०२१ पासून वनविभागात नव्या ’पीओआर’नुसार वनगुन्हे दाखल करण्यात येणार आहे.ब्रिटिशकालीन वनगुन्हा पद्धत कालबाह्य करण्याचा निर्णय घेतला आहे. हे मी स्वत: टि्वट केले आहे. सविस्तर बदल करताना यात सुधारणादेखील करण्यात आली आहे, पोलिसांप्रमाणे प्राथमिक वनगुन्हा रिपोर्ट तीन पानांचा असणार आहे. ही नियमावली लागू झाली आहे.- संजय राठोड, वनमंत्री महाराष्ट्र

टॅग्स :forest departmentवनविभागforestजंगल