शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

६६ हजारावर अंगणवाडीतही चिमुकल्यांना इंग्रजीचे धडे; ग्रामीण भागातील २ हजार ५९२ केंद्रात

By जितेंद्र दखने | Updated: July 15, 2024 19:53 IST

नवा प्रयोग : ग्रामीण भागातील २ हजार ५९२ केंद्रात

अमरावती: अंगणवाडीतील बालकांना आनंददायी शिक्षण मिळावं, बालकांच्या मनातील इंग्रजी विषयांची भीती कमी व्हावी तसेच इंग्रजी विषयात त्यांना बालपणापासूनच आवड निर्माण व्हावी आणि पालकांचा इंग्रजी शिक्षणाकडे वाढता कौल लक्षात घेता त्यांच्या अपेक्षाही पूर्ण व्हाव्यात यासाठी आता जिल्ह्यातील २ हजार ५९२ अंगणवाडी केंद्रातील ६६ हजार ३६३ चिमुकल्यांना इंग्रजी शिक्षण शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. महिला व बालकल्याण विभागाच्या या नाविण्यपूर्ण उपक्रमाचा श्रीगणेशा शिराळा येथील केंद्रात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.

इंग्रजी शिक्षण हे आता काळाची गरज बनली आहे. इंग्रजी ही रोजच्या बोलण्यातील भाषा होत आहे. जास्तीत ज्ञान आजही इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे. इंग्रजी ही संवादाची, व्यापारांची आणि आंतरराष्ट्रीय भाषा असल्यामुळे या पिढीतील बालके इंग्रजी विषयात कुठेही कमी पडू नये किंवा इंग्रजी विषयाबद्दल त्यांच्या मनात भीती असू नये हा उद्देश समोर ठेवून राबविला जात आहे. या उपक्रमात दर महिन्यात दोन कविता, काही परिचित शब्द, काही क्रियात्मक शब्द, तीन अल्फाबेट आणि दोन अंक असा अभ्यासक्रम अंगणवाडी सेविकांसाठी तयार केला आहे. यासाठी सर्व पर्यवेक्षिकांना,अंगणवाडी सेविकांना जिल्हास्तरावर प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे अंगणवाडी केंद्रात हा अभ्यासक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हास्तरावरून सनियंत्रण ठेवले जाणार आहे. दरमहिन्याला मूल्यांकनप्रत्येक महिन्याच्या शेवटी पर्यवेक्षकेमार्फत दुसऱ्या अंगणवाडी केंद्रांचे मूल्यांकन केले जाणार असून हा अभ्यासक्रम किती उपयुक्त आहे. याची पडताळणी ही करण्यात येणार असल्याचे महिला व बालकल्याण विभागाचे डेप्युटी सीईओ डॉ. कैलास घोडके यांनी सांगितले. सहा वर्षापर्यंत बालकांचा ९० टक्के विकास होतो. त्यामुळे बालक कोणतीही भाषा सहज अवगत करू शकते.त्यामुळे इंग्रजी ही भाषा सुद्धा अंगणवाडी केंद्रातील बालके सहज अवगत करतील आणि नवीन नवीन शब्द त्यांना ज्ञात होतील. अशा प्रकारचा उपक्रम राबविणारा अमरावती हा राज्यातील पहिला जिल्हा आहे. - सौरभ कटियार, जिल्हाधिकारी अमरावती

टॅग्स :AmravatiअमरावतीSchoolशाळा