शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
7
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
8
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
9
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
10
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
11
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
12
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
13
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
14
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
15
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
16
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
17
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
18
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
19
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
20
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेतील ६४ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन रोखले

By admin | Updated: September 7, 2016 00:14 IST

अग्रीम राशीचे समायोजन न केल्याने महापालिकेतील ६४ अधिकारी -कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्यात आले आहे.

अग्रीम समायोजनात लेटलतिफी : ८७ लाखांची रक्कम अंगावर प्रदीप भाकरे अमरावतीअग्रीम राशीचे समायोजन न केल्याने महापालिकेतील ६४ अधिकारी -कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्यात आले आहे. अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांनी नोंदविलेल्या निरीक्षणानंतर लेखा विभागाने हा कारवाईचा दंडुका उगारला .एखादा कार्यक्रम किंवा एखादे काम करण्यासाठी महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी अग्रीम रक्कम उचलतात. त्या कामाला येणारा अंदाजे खर्च विचारात घेता अ‍ॅडव्हांस म्हणून घेतलेल्या त्यारकमेला अग्रीम असे संबोधले जाते. या अग्रीम रकमेचे समायोजन करणे बंधनकारक आहे. अर्थात त्या अग्रीम रकमेतून नेमका कोणता खर्च करण्यात आला, त्यासंबंधाने संपूर्ण हिशेब देणे अभिप्रेत आहे. त्या खर्चाच्या पावत्याही देणे बंधनकारक आहे. उदा.शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला २० हजार रुपये खर्च अपेक्षित असेल तर अग्रीम म्हणून तेवढी रक्कम घेतली जाते. कार्यक्रम झाल्यानंतर त्या २० हजार रुपयांचा हिशेब देऊन त्या रकमेचे समायोजन केले जाते. मात्र, महापालिकेतील बहुतांश अधिकारी कर्मचाऱ्यांनी या समायोजनाला फाटा दिल्याने ८६.६१ लाख रुपयांच्या अग्रीमाचे समायोजन रखडले आहे. काहींनी यात आर्थिक अनियमिततेचा संशयही व्यक्त केला आहे. तीन ते चार वर्षांपासून त्या अग्रीम रकमेच्या हिशेबात ताळतंत्र न राहिल्याने ८७ लाख रुपयांचा प्रशाासकीय घोळ घालण्यात आला. अतिरिक्त आयुक्त म्हणून रुजू झाल्यानंतर शेटे यांनी त्या फाईलची तपासणी केली. त्यावेळी ही लेटलतिफी उघड झाली. त्यानंतर संबंधितांना नोटीस पाठविण्यात आल्यात. अग्रीम रकमेचे समायोजन न करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन रोखण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले.बरहुकूम मुख्य लेखा अधिकाऱ्यांनी ६४ जणांचे जुलै महिन्याचे वेतन रोखले आहे.वेतन रोखल्याने संबंधितांची आंतरिक तगमग वाढली आहे. काहींनी ती रक्कम भरण्याची तयारी चालविली असून काहीजण अधिकाऱ्यांचे दालनाचे उंबरठे झिजविण्यात धन्यता मानत आहेत.विभागप्रमुख आणि कर्मचारी ८७ लाख रुपयांचा भरणा नेमका केव्हा करतात, याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.अतिरिक्त आयुक्तांचे पत्रमहापालिकेतील अधिकारी-कर्मचारी वर्ग वेळोवेळी अग्रीम घेत असतात. त्या रकमेचे समायोजन होणे आवश्यक असते. मात्र, बऱ्याच विभागप्रमुख, कर्मचाऱ्यांनी त्यांनी घेतलेल्या अग्रीम रकमेचे समायोजन केलेले नाही. ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असल्याचा ठपका अतिरिक्त आयुक्तांनी ठेवला आहे. या अग्रीम राशीचे समायोजन १५ दिवसांत करावे, अशा सूचना त्यांनी मुख्य लेखापरीक्षकांना दिल्या आहेत.