शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
4
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
5
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
6
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
7
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
8
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
9
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
10
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
11
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
12
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
13
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
14
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
15
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
16
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
17
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
18
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
19
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
20
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

आसरा येथे ६३ हजारांचे बनावट डीएपी खत जप्त

By admin | Updated: June 23, 2014 23:38 IST

रासायनिक खत कंपनीचे अधिकारी असे दर्शवून भातकुली तालुक्यातील आसरा येथील ८ शेतकऱ्यांना डीएपी या रासायनिक खताच्या नावावर दाणेदार भूवरदान खतांच्या ६३ पोत्यांची विक्री करून

जि. प. कृषीची कारवाई : शेतकऱ्यांची तक्रार, ४३ बॅगची आगाऊ बुकिंगअमरावती : रासायनिक खत कंपनीचे अधिकारी असे दर्शवून भातकुली तालुक्यातील आसरा येथील ८ शेतकऱ्यांना डीएपी या रासायनिक खताच्या नावावर दाणेदार भूवरदान खतांच्या ६३ पोत्यांची विक्री करून फसवणूक करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या पथकाने सोमवारी आसरा येथे जाऊन खताचे नमुने घेऊन खत जप्त केले. तसेच अ‍ॅग्रो केमिकल्स या कंपनी व विक्रेत्या विरोधात भातकुली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आसरा येथे दोन दिवसांपूर्वी मोठ्या वाहनाद्वारा दोन व्यक्ती आले होते. त्यांनी अ‍ॅग्रो केमिकल्स (एफएमसी) पेट्रोलपंप (ठाणा), भंडारा या डीएपी या रासायनिक कंपनीचे अधिकारी असल्याचे दर्शवून ११८० रूपयांची बॅग केवळ कंपनीच्या प्रचारासाठी १००० रुपयांत देणार आहोत व काही दिवसांसाठीच कंपनीची स्कीम असल्याचे सांगितले. या गावातील ८ शेतकऱ्यांनी ६३ हजारांच्या ६३ बॅग विकत घेतल्या. काही शेतकऱ्यांनी या व्यक्तींना आगाऊ पैसे देऊन ४५ बॅगचीदेखील बुकिंग केली. काही शेतकऱ्यांना याविषयीची शंका आल्याने त्यांनी कृषी विभागाला कळविले. आज जिल्हा परिषद कृषी विभागाच्या पथकाने आसरा गाठून खताची पाहणी केली असता हे खत डीएपी नसून भूवरदान कंपनीचे भूसुधार प्रतीचे दाणेदार खत असल्याचे उघड झाले. बाजारात या खताची किंमत २०० ते २५० रूपयांचे दरम्यान आहे. पथकाद्वारा या खताचे नमुने घेण्यात आले व ते एफ. सी. एल. (फरर्टिलायझर कंट्रोल लॅबारेटरी) येथे पाठविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करून बनावट खत विकणाऱ्या व्यक्तीचे नाव मयूर देशपांडे (रा. भंडारा) व सुमित मेश्राम (रा. यशोदानगर, भीम टेकडीजवळ, अमरावती) असे आहे. कृषी पथकाद्वारा या बनावट रासायनिक खत कंपनी व या दोन्ही विरोधात भातकुली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विभागीय कृषी सहसंचालक अशोक लोखंडे, विभागीय गुण नियंत्रण अधिकारी सी. जी. देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे मार्गदर्शनात कृषी विकास अधिकारी दिलीप काकडे, जिल्हा गुणनियंत्रक अधिकारी पुरूषोत्तम कडू यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.(प्रतिनिधी)