शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

एफडीएच्या 55 ठिकाणी धाडी 62 लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 05:00 IST

एफडीच्या अन्न व सुरक्षा अधिकाऱ्यांनी कारवाई करून गत सहा वर्षांत १४९३ ठिकाणी तपासण्याकरण्यात आल्या. तपासणी दरम्यान ४७४ ठिकाणी अवैध गुटखासाठा आढळून आला. या दरम्यान अधिकाऱ्यांनी ४ कोटी ७६ लाख २९ हजार ८९४ रुपयांचा गुटखासाठा जप्त करण्यात आला. सदरची कारवाई ही सन २०१५ ते १८ मार्च २०२१ दरम्यान करण्यात आली. 

ठळक मुद्देवर्षभरातील कारवाई, सात ट्रक गुटखा इमारतीत पडून

संदीप मानकरलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अन्न व प्रशासन विभागाने अमरावती जिल्ह्यात एप्रिल २०२० ते  १८ मार्च २०२१ दरम्यान  २१३ ठिकाणी तपासण्या केल्या, तर ५५ ठिकाणी धाडी टाकून गुटखा आढळून आल्याने आतापर्यंत ६२ लाख ४१ हजार ७७८ रुपयांचा अवैध गुटखा जप्त केल्याची माहिती अन्न व प्रशासन विभागाचे सहआयुक्त सुरेश अन्नपुरे यांनी दिली.गतवर्षी २०१९-२० मध्ये १२२ ठिकाणी एफडीच्या अधिकाऱ्यांनी तपासण्या करून ४० ठिकाणी धाडी टाकल्या. या कारवाईत ३० लाख २१ हजारांचा अवैध गुटखासाठा जप्त करण्यात आला.  शासनाने राज्यात गुटखा बंदी केली. अवैध गुटखा विक्री करणाऱ्यावर अन्न सुरक्षा मानदे कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात येतो. येथील मध्यवर्ती आगाराजवळ एका डॉक्टरची इमारात एफडीच्या कार्यालयाकरिता गत एका तपापूर्वी भाड्याने घेतली आहे. येथूनच अन्न व औषधी प्रशासन विभागाचा कारभार होता. जप्त केलेला गुटखा ठेवण्याकरिता येथे जागा अपुरी पडत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. येथे जप्त केलेला सात ट्रक गुटखा ठेण्यात आला आहे. गुटखा नष्ट करण्याची परवानी एफडीच्या अधिकाऱ्यांनी  शासनाला मागतिली. मात्र, काही कारणास्तव  याला स्थगिती मिळाली.  

सहा वर्षांत पाच कोटींचा गुटखा जप्त एफडीच्या अन्न व सुरक्षा अधिकाऱ्यांनी कारवाई करून गत सहा वर्षांत १४९३ ठिकाणी तपासण्याकरण्यात आल्या. तपासणी दरम्यान ४७४ ठिकाणी अवैध गुटखासाठा आढळून आला. या दरम्यान अधिकाऱ्यांनी ४ कोटी ७६ लाख २९ हजार ८९४ रुपयांचा गुटखासाठा जप्त करण्यात आला. सदरची कारवाई ही सन २०१५ ते १८ मार्च २०२१ दरम्यान करण्यात आली.  

 भाड्याच्या इमारतीत कारभारमध्यवर्ती आगराजवळील डॉक्टरकडून भाड्याने घेतलेल्या इमारातील गत अनेक वर्षापासून एफडीचा कारभार सुरू आहे. अनेक रूम गुटखासाठ्याने भरल्या असल्याने अधिकाऱ्यांनासुद्धा बसण्याकरिता या इमारतीत स्वतंत्र जागा शिल्लक नसल्याचे वास्तव आहे. 

इमारात भाड्याची आहे. शासनाने एफडीएच्या कार्यालयाकरीता जागार आरक्षित केली आहे. मात्र, अद्याप इमारत नाही. यंदा लॉकडाऊन असतानाही ६२ लाखांचा गुटखा जप्त केला. - सुरेश अन्नपुरे, सहआयुक्त अन्न व प्रशासन विभाग

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदी