शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

ग्रँड महेफिलचे पाच हजार चौरस स्क्वेअर फूट बांधकाम अवैध

By admin | Updated: June 30, 2015 00:14 IST

स्थानिक कॅम्प स्थित हॉटेल ग्रँड महेफिलचे मंजुरीपेक्षा पाच हजार चौरस स्क्वेअर फूट अतिरिक्त बांधकाम असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आयुक्तांनी दिले होते मोजणीचे आदेश : दंडात्मक रक्कम वसूल करण्याचे संकेतअमरावती : स्थानिक कॅम्प स्थित हॉटेल ग्रँड महेफिलचे मंजुरीपेक्षा पाच हजार चौरस स्क्वेअर फूट अतिरिक्त बांधकाम असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हॉटेलच्या बांधकामाची मोजणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनीच दिले होते, हे विशेष!गत आठवड्यात सहायक संचालक नगररचना अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात एका चमूने हॉटेल ग्रँड महेफिलच्या बांधकामाची तपासणी केली आहे. या हॉटेलच्या बांधकामाला सन २०१२-२०१३ मध्ये मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. प्रशस्त आणि भव्यदिव्य असे साकारण्यात आलेल्या हॉटेल ग्रँड महेफिलचे मूळ मालक कोण? हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. मात्र, महापालिकेच्या राजकारणात हॉटेल महेफिलचा विषय प्रकर्षाने चर्चिला जातो, हे वास्तव आहे. मग ते अतिक्रमण असो वा पार्किंग, बांधकाम परवानगी अथवा कर आकारणीचा विषय असोत नगरसेवक हे या हॉटेल महेफीलकडे बोट दाखविल्याशिवाय राहत नाही. याच श्रृंखलेत आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी नियमबाह्य बांधकाम, अतिरिक्त बांधकाम करणाऱ्या २८ प्रतिष्ठानांची यादी तयार करुन त्यांचे मोजमाप करण्याचे ठरविले होते. यात हॉटेल महेफिल व हॉटेल ग्रँड महेफिलचा समावेश होता. परंतु या दोन्ही हॉटेलवर एका राजकीय व्यक्तीची कृपादृष्टी असल्याने महापालिका प्रशासन त्या बांधकामाचे मोजमाप करु शकत नाही, असा अंदाज बांधला गेला होता. परंतु सगळे अंदाज फोल ठरवीत आयुक्त गुडेवार यांनी हॉटेल ग्रँड महेफीलच्या बांधकामाची तपासणी करण्यासाठी वर्ग १ च्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सहायक संचालक नगररचना विभागाचे सुरेंद्र कांबळे यांच्या नेतृत्त्वात अभियंत्यांनी या दोन्ही हॉटेलच्या बांधकामाची तपासणी केली आहे. दोन्ही हॉटेलच्या बांधकामात किंतु-परंतु असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एडीटीपीला हजर राहण्याची सूचनाहॉटेल ग्रँड महेफिलच्या बांंधकाम तपासणीदरम्यान सहायक संचालक नगररचना (एडीटीपी) अधिकाऱ्यांना घटनास्थळी जातीने हजर राहण्याची सूचना आयुक्तांनी दिली होती. त्यानुसार गत आठवड्यात एडीटीपीने बांधकाम तपासणी केली आहे. बांधकाम तपासणीचा अहवाल तयार झाला असून आयुक्त येताच त्यांच्या पुढ्यात हा अहवाल ठेवण्यात येईल.डहाके म्हणतात, आयुक्तांनी हेही करावे!महापालिकेच्या मालकीचे जोशी मार्केट तसेच जोशी महल, ट्रक टर्मिनल, नवसारीतील बीओटी तत्त्वावरील संकुल यांची तपासणी करून आयुक्तांनी नियमसंगत कर वसुली करावी. हडपण्यात आलेली श्याम चौकातील पार्किंगची जागा आयुक्तांनी ताब्यात घ्यावी. महापालिकेच्या सभोवती असलेले मार्केट नियमानुसार चालेल, अशी शिस्तही गुडेवारांनी लावावी, अशी मागणी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेता तथा ज्येष्ठ सदस्य दिगंबर डहाके यांनी केली. हॉटेल महेफिल व ग्रॅड महेफिलच्या बांधकाम तपासणीचे आदेश दिले आहेत. त्याकरिता वरिष्ठ स्तरावरील वर्ग १च्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती. याप्रकरणी अहवाल प्राप्त व्हायचा आहे. नियमसंगतरित्या प्रकरणाची दखल घेतली जाईल.- चंद्रकांत गुडेवार, आयुक्त, महापालिका.