ग्रंथालय पुरस्कारासाठी ५० टक्के गुण अनिवार्य

By Admin | Updated: September 21, 2015 00:10 IST2015-09-21T00:10:07+5:302015-09-21T00:10:07+5:30

ग्रंथालय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी शासनाकडून देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार..

50% marks mandatory for the Library Awards | ग्रंथालय पुरस्कारासाठी ५० टक्के गुण अनिवार्य

ग्रंथालय पुरस्कारासाठी ५० टक्के गुण अनिवार्य

३० सप्टेंबर ‘डेडलाईन’ : ग्रंथालय पुरस्काराच्या अटी, शर्थीत बदल
अमरावती : ग्रंथालय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी शासनाकडून देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार तसेच उत्कृष्ट ग्रंथालय सेवक पुरस्काराच्या अटी व शर्थीमध्ये बदल करण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी आता ५० टक्के गुण प्राप्त करणारे ग्रंथालय, ग्रंथालय कार्यकर्ते व ग्रंथालय सेवक पात्र ठरणार आहेत. या पुरस्कारासाठी अर्ज स्वीकृती सुरू असून ३० सप्टेंबर ही स्वीकृतीची अंतिम मुदत राहील.
ग्रंथालय चळवळीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रंथालयांना शासनाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वोत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार, उत्कृष्ट कामगिरी करणारे कार्यकर्ता व ग्रंथालय सेवकांना डॉ. एस.आर. रंगनाथन उत्कृष्ट कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र पुरस्कार देण्यात येतो.
यासंदर्भातील पूर्वीचे शासन निर्णय अधिक्रमित करून पुरस्काराबाबत अटी, निकष, निवड प्रक्रिया आणि सुधारित कार्यपद्धती निश्चित करून सुधारित नियम निर्गमित करण्यात आली आहे, पुरस्काराबाबतच्या अटी व गुणवत्तेच्या निकषांची पूर्तता करणाऱ्या तसेच किमान ५० टक्के गुण प्राप्त करणाऱ्या ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक यांनाच पुरस्कारास पात्र ठरविले जाईल. एखाद्या वर्षी प्राथमिक अटी व निकषांची पूर्तता होत नसल्यास तसेच ज्या पुरस्कारात किमान ५० टक्के गुण प्राप्त करणारे ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक नसेल त्यावर्षी तो पुरस्कार दिला जाणार नाही. ग्रंथालयास एकदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार मिळाल्यानंतर व ग्रंथालय सेवक कार्यकर्त्यास डॉ.एस.आर. रंगनाथन पुरस्कार मिळाल्यानंतर सदर पुरस्कारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही. प्राथमिक अटीचा भंग झाल्यास पुरस्कार व अनुषंगिक सोयीसुविधा परत घेण्यात येऊन संबंधितावर कारवाई करण्याचा निर्णय राज्य शासनाचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाने २७ आॅगस्ट २०१५ रोजी घेतला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 50% marks mandatory for the Library Awards