शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेतील ४७ शिक्षकांवर कारवाई होणार

By admin | Updated: June 5, 2015 00:32 IST

नियमित वेतनाच्या मागणीसाठी २५ मार्च २०१५ रोजी महापालिका शाळांमधील शिक्षकांनी विनापरवानगी काढलेल्या मोर्चाप्रकरणी ४७ शिक्षकांवर ...

आयुक्तांची प्रतीक्षा : मोर्चा काढणे भोवले, फाईल मंजूरअमरावती : नियमित वेतनाच्या मागणीसाठी २५ मार्च २०१५ रोजी महापालिका शाळांमधील शिक्षकांनी विनापरवानगी काढलेल्या मोर्चाप्रकरणी ४७ शिक्षकांवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. याविषयीची फाईल मंजूर करण्यात आली असून आयुक्त चंद्रकांत गुडेवार रजेवरुन परतताच शिक्षकांवर कारवाई होण्याचे संकेत आहेत. तत्कालीन आयुक्त अरुण डोंगरे यांच्या कार्यकाळात वेतनासाठी शिक्षकांनी मोर्चा काढला होता. परंतु या मोर्चाला प्रशासनाने परवानगी दिली नव्हती. तरीदेखील शिक्षकांनी मोर्चा काढून मागणी रेटून धरली. त्यावेळी आयुक्तांनी मोर्चेकरी शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शिक्षणाधिकारी अरुणा डांगे यांना मोर्चेकरी शिक्षकांची शाळानिहाय यादी तयार करण्याच्या सूचना तत्कालीन आयुक्त अरुण डोंगरे यांनी दिल्या होत्या. नियमानुसार प्रस्तावित कारवाईचे असे आहे स्वरूप विनापरवानगी मोर्चा अथवा संप पुकारल्यास सेवा शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी संबंधित शिक्षकांवर कारवाई कोणती करावी,हे अधिकार आयुक्तांना आहेत. यात तीन वेतनवाढ रोखणे, वेतनकपात, निलंबन, सेवा समाप्ती, बडतर्फ करणे, पदावनत करणे आदींचा समावेश आहे.मोर्चेकरी शिक्षकांवर कारवाई करण्याला मंजुरी मिळाली आहे. कारवाईची रुपरेषा अद्याप निश्चित नाही. परंतु आयुक्त गुडेवार यांनी कारवाई करण्याचे ठरविल्याने तेच याबाबतचा पुढील निर्णय घेतील. -प्रवीण पाटील,शाळा निरिक्षक, महापालिका.आयुक्तांकडून होणारी कारवाई पाहूनच शिक्षकांची पुढची भूमिका ठरविली जाईल. शिक्षकांनी न्याय्य मागणीसाठी आंदोलन केले. त्यामुळे यात गैर काहीही नाही.-गोपाल कांबळे, अध्यक्ष,म.रा.प्राथमिक शिक्षक संघटना.