शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

443 कोटींचा आराखडा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 05:01 IST

बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेत सन  २०२२-२३ या वर्षात सर्वसाधारण योजनेत २६० कोटी ५६ लाख नियतव्यय, अनुसूचित जाती उपयोजनेत १०१ कोटी २० लाख व आदिवासी उपयोजनेत ८१ कोटी ५५ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. मेळघाटसह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील विकासकामांचा समावेश नियोजनात करण्यात आला आहे.  त्याचप्रमाणे, सर्व लोकप्रतिनिधी व समिती सदस्यांची मागणी लक्षात घेऊन आवश्यक तरतुदी करण्यात येतील.

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा वार्षिक योजनेत सन २०२२-२३ या वर्षात विविध विकासकामांसाठी ४४३ कोटी ३१ लाख रुपयांचे निधीच्या आराखड्याला १२ जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. 
जिल्हा वार्षिक योजनेत २०२२-२३ चा आराखडा व चालू वर्षातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री यशोमती ठाकूर अध्यक्षतेखाली  पार पडली. या बैठकीला कोविड प्रतिबंधक उपाययोजनेच्या अनुषंगाने पालकमंत्री व इतर अनेक लाेकप्रतिनिधी बैठकीत ऑनलाईन सहभागी झाले होते. जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू, खा. रामदास तडस, आमदार सुलभा खोडके, बळवंत वानखडे, राजकुमार पटेल, देवेंद्र भुयार, प्रताप अडसड,  किरण सरनाईक, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, महापौर चेतन गावंडे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेत सन  २०२२-२३ या वर्षात सर्वसाधारण योजनेत २६० कोटी ५६ लाख नियतव्यय, अनुसूचित जाती उपयोजनेत १०१ कोटी २० लाख व आदिवासी उपयोजनेत ८१ कोटी ५५ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. मेळघाटसह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील विकासकामांचा समावेश नियोजनात करण्यात आला आहे.  त्याचप्रमाणे, सर्व लोकप्रतिनिधी व समिती सदस्यांची मागणी लक्षात घेऊन आवश्यक तरतुदी करण्यात येतील. विकासकामांना निधीची उणीव भासू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.
महिला व बालकांच्या सशक्तीकरणासाठी विविध योजना, उपक्रम, महिला व बालविकास भवन, महिला बचत गटांचे जाळे, आरोग्य सेवेचे बळकटीकरण, जिल्हा व ग्रामीण रस्त्यांचा विकास व बळकटीकरण, पर्यटनासाठी पायाभूत सुविधा, कृषी संलग्न सेवा आदी बाबींचा नियोजनात समावेश आहे.

दोन खासदार, तीन आमदारांचा ‘त्या’ दोन विषयांना विरोध
जिल्हा परिषदेसाठी मंजूर करण्यात येणाऱ्या निधीचे व्यवस्थितपणे वितरण होत नसल्याचा आरोप जिल्हा नियोजन समिती सदस्यांनी केला आहे. यासंदर्भात खासदार रामदास तडस, नवनीत राणा, आमदार प्रताप अडसड, रवि राणा आणि राजकुमार पटेल, महापौर चेतन गावंडे तसेच जिल्हा परिषद सदस्य रवींद्र मुंदे आदी सदस्यांनी सदर प्रारूप आराखड्यास आमची मान्यता नसल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे  समिती अंतर्गत सुंदोपसुंदी चव्हाट्यावर आली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या विषय सूचिवरील विषय क्रमांक २ मध्ये सन २०२१-२२  माहे डिसेंबर अखेरपर्यंत खर्चाचा आढावा, खर्चास मान्यता हा विषय तसेच विषय क्रमांक ३ जिल्हा वार्षिक योजना २०२२-२३ आराखड्यास मान्यता देणे हा विषय ठेवण्यात आला होता. 

मिशन मोडवर पूर्ण करा विकासाची कामे
यापूर्वीच्या नियोजनानुसार ३०० कोटी रूपये निधीतून जिल्ह्यात अनेक महत्त्वपूर्ण कामांना चालना देण्यात आली. कोविडकाळात आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी जिल्हा व ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण करण्यात आले. नियोजनातील अनेक कामे अद्यापही प्रगतीपथावर आहेत. विहित मुदतीत ती कामे पूर्ण होणे आवश्यक आहे. कुठलेही काम प्रलंबित व निधी अखर्चित राहता कामा नये. प्रशासनाने ‘मिशन मोड’वर प्रत्येक काम पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले. 

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर