शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

भातकुली तालुक्यात एका ग्रामपंचायतीसह ४२ सदस्य अविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:29 IST

टाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील हातखेडा ग्रामपंचायतीसह तालुक्यातील ४२ सदस्य अविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता २६९ जागांकरिता ६५६ ...

टाकरखेडा संभू : भातकुली तालुक्यातील हातखेडा ग्रामपंचायतीसह तालुक्यातील ४२ सदस्य अविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे आता २६९ जागांकरिता ६५६ उमेदवार भाग्य आजमावणार आहेत. एका जागेकरिता मात्र अर्जच दाखल न झाल्याने तेथील जागा रिक्त राहणार आहे.

भातकुली तालुक्यात ३६ ग्रामपंचायतींमध्ये असलेल्या ३१२ जागांकरिता निवडणूक लागली. २३ ते ३० डिसेेंबर दरम्यान ७७३ नामांकन दाखल झाले होते. यापैकी पाच अर्ज अवैध ठरले, तर ४ जानेवारीला अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ७० उमेदवारांनी माघार घेतली. यामुळे सात सदस्यीय हातखेडा ग्रामपंचायतीत सहा सदस्य अविरोध निव़डून आले. अनुसूचित जमाती महीला प्रवर्गातील एकही अर्ज दाखल न झाल्याने एक जागा रिक्त राहणार आहे.

तालुक्यातील ४२ उमेदवार अविरोध निवडून आल्याने आता २६९ जागांकरिता येत्या १५ जानेवारीला रिंगणात असलेले ६५६ उमेदवार भाग्य आजमावणार आहेत. याकरिता प्रशासन सज्ज झाले आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर उपाययोजना केल्या जात आहेत. एका उमेदवारांसह केवळ पाच जणांनाच प्रचाराची मुभा आहे.