शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

सव्वातीन हजार शेतकरी मोजणीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 05:00 IST

शासकीय केंद्रावर कापूस विक्रीसाठी तालुक्यातील ३८९२ शेतकऱ्यांनी ठरलेल्या मुदतीत नोंद केली. यापैकी ६४३ शेतकºयांकडून लेहेगाव या एका केंद्रावर २६ मेपर्यंत कापूस नेण्यात आला. उर्वरित ३२४९ शेतकरी कापूसकोंडीत आहेत. एका केंद्रावर शंभर शेतकऱ्यांचा कापूस मोजणीचा आदेश असला तरी मजुरांची कमतरता, फिजिकल डिस्टन्सिंग यामुळे ही संख्या निम्म्याहून कमी आहे.

ठळक मुद्देदोन केंद्रे वाढली : कामाची गती वाढवा; खरिपाच्या तोंडावर कापूस घरीच

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : पेरणी तोंडावर आली असताना तालुक्यातील सव्वतीन हजार शेतकरी कापूस मोजणीच्या प्रतीक्षेत आहेत. खरेदीचा वेग वाढावा म्हणून आणखी दोन केंद्रे २७ मेपासून वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. ती सुरू झाली असून, यामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या घरात कापूस आहे का, याची खारतजमा पथके नेमून केली जात असल्यामुळे व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.शासकीय केंद्रावर कापूस विक्रीसाठी तालुक्यातील ३८९२ शेतकऱ्यांनी ठरलेल्या मुदतीत नोंद केली. यापैकी ६४३ शेतकºयांकडून लेहेगाव या एका केंद्रावर २६ मेपर्यंत कापूस नेण्यात आला. उर्वरित ३२४९ शेतकरी कापूसकोंडीत आहेत. एका केंद्रावर शंभर शेतकऱ्यांचा कापूस मोजणीचा आदेश असला तरी मजुरांची कमतरता, फिजिकल डिस्टन्सिंग यामुळे ही संख्या निम्म्याहून कमी आहे. यासाठी माहुली, शहापूर (वरूड) या केंद्रावर २७ मे पासून कापूस खरेदी सुरू असली तरी पावसाळ्यापूर्वी कापूस उचलणे कठीण झाले. पेरणी तोंडावर आली असताना विक्रीनंतरही चुकारे कधी मिळणार, याची चिंता शेतकऱ्यांना आहे.दुसरीकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा घरात कापूस आहे का, याची खातरजमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी सहायक निबंधकांना दिले असून, त्यांनी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी कृषिउत्पन्न बाजार समितीकडून घेतली आहे. सत्यता पडताळणीसाठी पथके नेमली असून, ही पथके २७ मेपासून कामी लागल्याचे सांगण्यात आले. व्यापाऱ्यांचा कापूस मोजण्यासाठी शेतकºयांचे सातबारे वापरल्याची शक्यता नाकारता येत नाही. असे प्रकारही प्रशासनाला दिसून पडत आहेत. हे याआधी झाले असते, तर आज व्यापाºयांऐवजी अनेक शेतकरी कापूस विकून मोकळे झाले असते . या अभियानातून किती शेतकऱ्यांना न्याय मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.लेहेगाव केंद्रावर ३० ते ४० शेतकरी कापूस मोजणीसाठी बोलावले जात होते. २७ मे पासून माहुली आणि शहापूर (वरूड) ही दोन केंद्रे सुरू झाल्यामुळे निश्चितच खरेदीचा वेग वाढेल; परंतु सव्वातीन हजार नोंदी शिल्लक आहेत.मोर्शी, हिवरखेड भागातील शेतकऱ्यांना शहापूर केंद्र दिले जाईल. माहुलीनजीकच्या शेतकऱ्यांना या केंद्रावर बोलावले जाईल. खरीप हंगामाच्या तोंडावर ही केंदे्र वाढली. कापूस निघाल्यावर सुरुवातीपासून शासनाने दखल घेतली असती, तर शेतकऱ्यांची लूट थांबली असती. शासकीय खरेदीचा भाव ५ हजार ५०० असला तरी व्यापारी ४२००, ४३०० रुपयांनी शेतकऱ्यांकडून कापूस मागत आहेत, शिवाय फरदड कापूस खरेदी करून शेतकऱ्यांच्या सात-बारावर विकत आहेत.

टॅग्स :cottonकापूस