शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

३०० कोटी वर्षिक नियोजन निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:15 IST

अमरावती : जिल्हा वार्षिक योजनेत जिल्ह्यासाठी ३०० कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ...

अमरावती : जिल्हा वार्षिक योजनेत जिल्ह्यासाठी ३०० कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील सोमवारी पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

नियोजन भवनात सन २०२१-२२ या वर्षासाठी जिल्हा नियोजनच्या प्रारूप आराखड्याबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला पालकमंत्री यशोमती ठाकूर, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, झेडपी अध्यक्ष बबलू देशमुख, नियोजनचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त पियूष सिंह, तसेच विभागातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील विविध नियोजित कामांबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सादरीकरण केले. नियोजनासाठीचा निधी २८५ कोटी रूपयांवरून ३०० कोटी रूपयांपर्यंत वाढवून मिळण्याची मागणी पालकमंत्री यशोमती ठाकूर व विविध लोकप्रतिनिधींनी केली, त्याला मान्यता दिली गेली.

बॉक्स

ही होणार वैशिष्ट्यपूर्ण कामे

जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनतून प्राथमिक आरोग्य केंद्राचे बळकटीकरण, पांदणरस्त्यांसाठी विशेष मॉडेल, ‘माझी वसुंधरा’मध्ये सौर ऊर्जा यंत्रणा, आमझरी येथे ‘मँगो व्हिलेज’, संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वलगाव येथे जिल्ह्यातील प्राचीन, ऐतिहासिक बाबींची माहिती देणारे प्रदर्शन व संग्रहालय उभारण्यात येणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा, डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जीवनचरित्र नव्या पिढीपर्यंत पोहोचावे यासाठी जेजे स्कूल ऑफ आर्टस्कडून विशेष प्रकल्प उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जलप्रकल्प व तेथील नैसर्गिक संपदा लक्षात घेता ‘इनलँड वॉटर टुरिझम’वर भर देण्यात येईल. जिल्ह्यात गारमेंट हब निर्माण करण्याचेही नियोजन आहे.