शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
2
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
3
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
4
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
5
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
6
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
7
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
8
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
9
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
10
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
11
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
12
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
13
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
14
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
15
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
16
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
17
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
18
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
19
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
20
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत १६ ऑक्सिजन प्लांट बंद; सिलिंडर खरेदीवर कोट्यवधींचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 16:10 IST

Amravati : कोरोनाकाळात उभारले होते प्लांट, दिवसाला १३.३६ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीची क्षमता

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :
कोरोनाकाळात रुग्णांना आवश्यक ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांच्या आवारात एकूण १६ ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले होते; परंतु पाच वर्षांपासून यातील एकही प्लांट कार्यान्वित केलेला नाही. त्यामुळे आजही शासकीय रुग्णालयातील रुग्णांना आवश्यक ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी दरवर्षी ऑक्सिजन सिलिंडरवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो. अशा स्थितीत प्लांटचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेक रुग्णांना ऑक्सिजनअभावी जीव गमवावा लागला होता. यावेळी शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. परिणामी ऑक्सिजनच्या अभावामुळे रुग्णांचा जीव जाऊ नये, यासाठी सरकार तसेच पीएम केअर फंड, तसेच इतर निधीतून प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले होते. जिल्ह्यातही शासकीय रुग्णालयांच्या आवारात १६ ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले. या सर्व ऑक्सिजन प्लांटची दिवसाला १३.३६ मेट्रिक टन अन् ऑक्सिजन निर्माण करण्याची क्षमता आहे; परंतु कोरोनाची लाट ओसरल्यामुळे या ऑक्सिजन प्लांटचा वापरच झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील इतर शासकीय रुग्णालयांत आजही बाहेरून ऑक्सिजन सिलिंडरचीच खरेदी केली जात असल्याची माहिती समोर आली.

या ठिकाणी आहेत ऑक्सिजन प्लांट

अमरावती, धारणी, तिवसा, चांदूर बाजार, बेनोडा, नांदगाव खंडेश्वर, अंजनगाव सुर्जी, चांदूर रेल्वे, मोर्शी, गुरुकुंज मोझरी, दर्यापूर, अचलपूर येथील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले आहेत.

टेक्निशियनची आवश्यकता

जिल्हात ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यासाठी तसेच त्यांच्या मेंटनन्ससाठी आवश्यक असलेले मनुष्यबळच रुग्णालय प्रशासनाला मिळालेला नाही.

ऑक्सिजन प्लांटची निर्मिती क्षमता (मेट्रिक टन)
रुग्णालयातील प्लांट                     निर्मिती क्षमता

उपजिल्हा रुग्णालय, धारणी            ०.३९
उपजिल्हा रुग्णालय, तिवसा            ०.३९
ग्रामीण रुग्णालय, चांदूर बाजार        ०.३९
बेनोडा (वरुड) पीएचसी                  ०.३९
जिल्हा स्त्री रुग्णालय, अमरावती       १.८७
ग्रामीण रुग्णालय, नांदगाव खंडे.       ०.३९
ग्रामीण रुग्णालय, अंजनगाव सुर्जी     ०.३९
सुपर हॉस्पिटल                             ०.९४
सुपर हॉस्पिटल                             ०.२४
ग्रामीण रुग्णालय, चांदूर रेल्वे           ०.२४
उपजिल्हा रुग्णालय, मोर्शी              ०.९४
सुपर हॉस्पिटल                             १.८७
आयुर्वेद महाविद्यालय, मोझरी          १.८७
उपजिल्हा रुग्णालय, दर्यापूर           ०.३७
इर्विन रुग्णालय                             १.१२
अचलपूर उपजिल्हा रुग्णालय          १.८७

खासगी रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट

कोविडकाळात परतवाडा येथील कृती रुग्णालयात १.५० मेट्रिक टन, दयासागर रुग्णालयात ०.२४ मेट्रिक टन, तर डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे ०.२४ मेट्रिक टन क्षमतेचे ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Amravati: 16 Oxygen Plants Shut, Crores Spent on Cylinders.

Web Summary : Sixteen oxygen plants in Amravati remain inactive despite being built during COVID. Hospitals spend crores annually on oxygen cylinders due to lack of technicians for plant maintenance. A total capacity of 13.36 metric tons of oxygen production is wasted.
टॅग्स :AmravatiअमरावतीHealthआरोग्यOxygen Cylinderऑक्सिजन