पुन्हा १४ संक्रमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 05:01 IST2020-06-15T05:00:00+5:302020-06-15T05:01:31+5:30

बडनेरा जुन्यावस्ती भागात एका आठवड्यापासून सातत्याने संक्रमित रुग्ण आढळून येत असल्याने हे प्रतिबंधित क्षेत्र आता कोरोनाचा नवा ‘हॉटस्पॉट’ बनला आहे. या व्यतिरिक्त रुख्मिनीनगरात ३७ वर्षीय पुरुष तसेच जिल्हा ग्रामीणमध्ये चांदूर बाजार येथे २५ वर्षीय महिला व घाटलाडकी येथे ३० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

14 infected again | पुन्हा १४ संक्रमित

पुन्हा १४ संक्रमित

ठळक मुद्देएकूण ३३८ : महापालिका क्षेत्रात ११, ग्रामीणमध्ये तीन

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विद्यापीठ लॅबद्वारा रविवारी प्राप्त अहवालांत १४ संक्रमितांची नोंद झाली. यामध्ये बडनेरात सात व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ३३८ वर पोहोचली आहे.
यामध्ये बडनेरा जुनीवस्तीमधील ७८, ७२, ५७, ४६, ३० पुरुष व २० वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात चारव्यक्ती नवीन संपर्कातील असल्याचे सांगण्यात आले. बडनेरा जुन्यावस्ती भागात एका आठवड्यापासून सातत्याने संक्रमित रुग्ण आढळून येत असल्याने हे प्रतिबंधित क्षेत्र आता कोरोनाचा नवा ‘हॉटस्पॉट’ बनला आहे. या व्यतिरिक्त रुख्मिनीनगरात ३७ वर्षीय पुरुष तसेच जिल्हा ग्रामीणमध्ये चांदूर बाजार येथे २५ वर्षीय महिला व घाटलाडकी येथे ३० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सायंकाळच्या अहवालात येथील पठाण चौकातील २३ वर्षीय तरुणी, बडनेरा नवी वस्तीतील रेल्वे क्वॉर्टर हॉकी मैदानाजवळ येथील ५२ वर्षीय महिला, तसेच नारायणनगरातील ५९ वर्षीय पुरुष व ५४ वर्षीय महिला व परतवाडा येथील ५२ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. बाधितांचे घराकडे जाणारे मार्ग बंद केले असून, या भागात आता आरोग्य पथकाचा 'वॉच' राहणार आहे. आठवडाभरात सातत्याने बाधित आढळल्याने नागरिकांत भीती वाढली आहे.

दोन व्यक्ती नागपूरला पॉझिटिव्ह
येथील अंबागेट परिसरात वास्तव्य असणारी ४० वर्षीय महिलेचा स्वॅब नागपूर तेथे घेण्यात आला होता. अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या महिलेला नागपूरलाच उपचारार्थ दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. परतवाडा येथील एक व्यक्ती मुंबई रिटर्न आहे. त्यांचा देखील अहवाल नागपूरलाच पॉझिटिव्ह आलेला आहे व या दोन्ही संक्रमितांची नोंद नागपूरला करण्यात आल्याची माहिती आहे.

Web Title: 14 infected again