शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

कापसाच्या थकीत चुकाऱ्यावर १० टक्के व्याज

By admin | Updated: March 13, 2015 00:18 IST

महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाने खरेदी केलेल्या कापसाचे चुकारे उशिरा मिळत असल्याबद्दल थकीत कापूस चुकाऱ्यावर शेतकऱ्यांना १० टक्के दराने व्याज देण्याचे आदेश ...

टाकरखेडा संभू : महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाने खरेदी केलेल्या कापसाचे चुकारे उशिरा मिळत असल्याबद्दल थकीत कापूस चुकाऱ्यावर शेतकऱ्यांना १० टक्के दराने व्याज देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पणन महासंघाला दिले आहे. मात्र व्याजाच्या मागणीसाठी कापूस उत्पादकांना पणन महासंघाकडे स्वतंत्रपणे दावे दाखल करावे लागणार असल्याची माहिती महाराष्ट्र सरपंच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन बोंडे यांनी दिली.या वर्षी अमरावती जिल्ह्यात पणन महासंघाने २४ फेब्रुवारीपर्यंत ३८ हजार ७४४ क्विंटल कापसाची खरेदी केली. अद्याप २२ हजार २४१ क्विंटल कापसाचे ७ कोटी ७० लाख रुपयांचे चुकारे पणन महासंघाकडे थकीत आहेत. राज्यात पणन महासंघाने कापूस खरेदी सुरु केली तेव्हापासून सातत्याने कापसाचे चुकारे विलंबाने होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन चुकत आहे. यासाठी महाराष्ट्र सरपंच संघटनेचे अध्यक्ष गजानन बोंडे व सहकाऱ्यांनी नागपूर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करुन कापसाच्या थकीत चुकाऱ्यावर कापूस उत्पादकांना १८ टक्के दराने व्याज देण्याची मागणी केली होती. महाराष्ट्र कापूस प्रक्रिया विपणन कायदा १९७१ नुसार महासंघाने खरेदी केलेल्या कापसाच्या चुकाऱ्याला विलंब लागल्यास १० टक्के दराने व्याज देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती जे.एन. पटेल व न्यायमूर्ती ए.एच. जोशी यांनी सन २००५ मध्ये दिले आहेत. चुकाऱ्याला विलंब झाल्यास शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जावर सहकारी संस्था व बँकांनी व्याज आकारु नये, असे निर्देश खंडपीठाने सरपंच संघटनेच्या जनहित याचिकेवर दिले आहेत.