शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
2
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
3
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
4
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
5
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
6
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
7
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
8
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
9
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
10
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
11
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
12
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
13
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
14
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
15
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
20
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलॉईन वेतन डाटा पाठविण्याची १0 मे ची 'डेडलाईन'

By admin | Updated: May 9, 2014 01:02 IST

येत्या शैक्षणिक सत्रापासून शिक्षकांचे ऑनलाईन वेतन प्रणाली लागू करायची असल्याने शिक्षकांच्या वेतनासंबंधित माहिती १0 मे पर्यंत पाठविणे अनिवार्य आहे.

अमरावती : येत्या शैक्षणिक सत्रापासून शिक्षकांचे ऑनलाईन वेतन प्रणाली लागू करायची असल्याने शिक्षकांच्या वेतनासंबंधित माहिती १0 मे पर्यंत पाठविणे अनिवार्य आहे. त्यानुसार शिक्षण संचालकांनी यंत्रणेला निर्देश दिले आहेत. याच पार्श्‍वभूमीवर महापालिक ा शिक्षण विभाग कामाला लागला असून बहुतांश माहितीचा डाटा पाठविण्यात आला आहे.
पुणे येथे शिक्षण विभागाने राज्यभरातील शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण विभागाशी संबंधित असलेल्या अधिकार्‍यांची नुकतीच बैठक घेतली. या बैठकीत शिक्षणाशी संबंधित असलेल्या ६८ मुद्यांवर चर्चा करण्यात आली. तारांकित, अतारांकित, लोकायुक्त, न्यायालयीन बाबी, शिक्षण अनुदान, संच मान्यता, परिवहन समिती, शालेय पोषण आहार, आरटीई नुसार शाळा तपासणी, सेवा ज्येष्ठता, बिंदू नामावली, शालार्थ, ऑनलाईन वेतन प्रणाली आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. विशेषत: शिक्षकांच्या ऑनलाईन वेतन प्रणालीत कोणत्याही त्रुट्या राहू नये, यासाठी निर्देश देण्यात आले आहे. त्यानुसार महापालिका शिक्षण विभागाने ६१ प्राथमिक तर ५ माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची माहिती पाठविण्याची तयारी चालविली आहे. बहुतांश शिक्षकांची माहिती पाठविली आहे. काही शिक्षकांची माहिती पाठविणे बाकी असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.
२५ शाळांची माहिती पाठविली
महापालिकेने ६५ शाळांपैकी २५ शाळांची माहिती मुख्याध्यापकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पाठविली आहे. उर्वरित शिक्षकांची माहिती पाठविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे शाळा निरीक्षक प्रवीण पाटील यांनी सांगितले. ३९४ शिक्षकांची माहिती पाठविणे, त्रुट्या राहू नये, यावर सर्वाधिक भर दिला जात आहे. काही विषयांवर शासनाचे मार्गदर्शन मागविले आहे. ते प्राप्त होताच शिक्षकांची माहिती पाठविली जाईल, असे पाटील म्हणाले.