शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

पक्षविरोधी कारवाया करणा-यांना कार्यकर्त्यांना घरचा रस्ता

By admin | Updated: February 18, 2017 02:34 IST

पक्षश्रेष्ठींनी मागितले स्थानिक पदाधिका-यांना अहवाल

अकोला, दि. १७-महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाने उभ्या केलेल्या उमेदवारांच्या विरोधात पडद्याआडून कारवाया करणार्‍या पदाधिकार्‍यांना घरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय प्रमुख राजकीय पक्षांनी घेतला आहे. यासंदर्भात पक्षश्रेष्ठींनी स्थानिक पदाधिकार्‍यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे. राजकीय पक्ष कोणताही असो त्यामध्ये समाजात प्रतिष्ठा मिळेल या उद्देशातून पदे घेऊन मिरवणार्‍यांची मोठी संख्या राहते. पाठीमागे कवडीचाही जनाधार नसताना केवळ वरिष्ठ नेत्यांचे आवभगत करणे, त्यांची बडदास्त राखणार्‍यांचे पेव फुटले आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी बोलताना मात्र पक्षात मोठे वजन असल्याचे भासवून दुकानदारी करणार्‍यांचे पितळ यंदा महापालिकेच्या निवडणुकीत उघडे पडले आहे. जाती-पातीच्या समीकरणांवर तिकिटासाठी पक्षाची मनधरणी करणार्‍या अशा पदाधिकारी-कार्यकर्त्यांना सर्वच पक्षांनी नाकारल्याचे चित्र आहे. असे पदाधिकारी-कार्यकर्ते पक्ष विरोधी कारवायांमध्ये गुंतले आहेत. पक्षाने निवडणूक रिंगणात उभ्या केलेल्या उमेदवाराचे काम न करता प्रतिस्पर्धी पक्षातील उमेदवारांच्या प्रचाराची आखणी करणे, मतांची जुळवाजुळव करण्याचे काम संबंधित पदाधिकार्‍यांनी सुरू केल्याची बाब प्रमुख राजकीय पक्षांच्या निदर्शनास आली आहे. पडद्याआडून पक्षविरोधी कारवायात गुंतलेल्या अशा पदाधिकार्‍यांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित राजकीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्याची माहिती आहे. निकालानंतर ठरणार भवितव्यमहापालिकेच्या निवडणुकीत पक्षाचे किती उमेदवार निवडून येतात, यावर संबंधित पदाधिकार्‍यांचे भवितव्य अवलंबून आहे. पक्षाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्यास संबंधितांची गच्छंती निश्‍चित मानली जात आहे.