शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

कापसाला अग्रीम बोनस केव्हा मिळणार?

By admin | Updated: November 29, 2014 21:56 IST

विदर्भातील कापूस उत्पादक शेतकरी प्रतीक्षेत.

अकोला: यावर्षी कापूस उत्पादनात प्रंचड घट झाली असून, त्यातच भावही पडल्याने, उत्पादन खर्चही निघणे कठीण झाल्याच्या पृष्ठभूमीवर, राज्य शासनाकडून अग्रीम बोनस केव्हा जाहीर केला जातो, याकडे विदर्भातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे. राज्याचे महसूल, तथा कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी कापूस उत्पादक शेतकर्‍यांना अग्रीम बोनस देण्याबाबत सरकार अनुकूल असल्याचे जाहीर केल्याने, राज्यातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आतापर्यंत शेतकर्‍यांनी भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय), महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघ आणि व्यापार्‍यांना कापूस विकला आहे; पण अग्रीम बोनसच्या घोषणेनंतर कापूस विकावा कुणाला, अशा संभ्रमात शेतकरी सापडला आहे. सध्या गरजेपोटी हजारो शेतकरी या तिन्ही कापूस खरेदीदारांना कापूस विकत आहेत; पण अग्रीम बोनसच्या घोषणेमुळे कापूस विकण्यासाठी शेतकर्‍यांचा कल कापूस उत्पादक पणन महासंघाकडे वाढत आहे. कापूस एकाधिकार योजना जोरात सुरू असताना, शेतकर्‍यांना पणन महासंघामार्फत अग्रीम बोनस देण्यात येत होता; परंतु ती योजना गुंडाळल्यानंतर, अग्रीम बोनसही बंद झाला. आता राज्यातील दुष्काळी स्थिती बघता, अग्रीम बोनस देण्यासाठी राज्य शासन अनुकूल असल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.  महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाचे संचालक शिरीष धोत्रे यांनी राज्य शासनाने, आर्थिक संकट सापडलेल्या कापूस उत्पादक शेतकर्‍यांना अग्रीम बोनस तातडीने जाहीर करण्याची अथवा प्रति क्विंटल हमी दर वाढवून देण्याची मागणी केली आहे. - एक ते दोन हजार अग्रीम बोनस ? कापसाला यावर्षी ४,0५0 रू पये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. प्रत्यक्षात प्रतवारीनुसार शेतकर्‍यांना ३,९00 रू पये प्रति क्विंटल भाव मिळत आहे; परंतु अग्रीम बोनस जाहीर झाल्यास शेतकर्‍यांना कापसाच्या प्रतवारीनुसार प्रति क्विंटल ५,८00 ते ५,९00 रुपयांपर्यंत दर मिळण्याची शक्यता आहे.