शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री अचानक अकोल्यात पोहोचतात तेव्हा.

By admin | Updated: January 7, 2015 01:30 IST

प्रशासनाची धावपळ, कृषिमंत्र्यांना सोडून नागपूरला रवाना.

अकोला - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी दुपारी अकोला येथे येऊन गेलेत. त्यांच्या या अघोषित दौर्‍यामुळे प्रशासनाची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. कृषिमंत्री एकनाथ खडसे यांना अकोला येथील शिवणी विमानतळावर सोडून त्यांचे विमान नागपूरच्या दिशेने रवाना झाले, तर ना. खडसे हेसुद्धा बाळापूर मार्गे मुक्ताईनगरकडे निघून गेलेत. मुंबईतील कामे आटोपून मुख्यमंत्री फडणवीस मंगळवारी दुपारी विमानाने नागपूरला येणार होते. त्याचवेळी कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनाही त्यांच्या गावाला जाण्यासाठी निघायचे असल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विमानातच अकोल्यापर्यंत येण्याचा निर्णय घेतला. अकोला येथून ना. खडसे यांना मुक्ताईनकरला जाणे सोयीचे होणार असल्याने त्यांनी या मार्गाचा वापर केला. मुख्यमंत्र्यांचे विमान शिवणी विमानतळावर येणार असल्याची माहिती दुपारी १ वाजताच्या सुमारास अकोल्यात धडकली आणि प्रशासनाची धावपळ सुरू झाली. विमानतळावरील बंदोबस्त लावण्यात आला. मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांच्या स्वागतासाठी अधिकारी धावपळ करीत विमानतळावर पोहोचले. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचे विमान पोहोचले. त्यामधून ना. खडसे बाहेर पडले, पण मुख्यमंत्र्यांनी बाहेर येण्याचे टाळले. त्यामुळे विनातळावर पोहोचलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला.मुख्यमंत्र्यांनी विमानात बसल्या बसल्याच निरोप घेतला आणि त्यांचे विमान नागपूरकडे रवाना झाले. त्यानंतर ना. खडसे खासगी वाहनाने बाळापूर मार्गे मुक्ताईनगरला रवाना झालेत. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार नारायणराव गव्हाणकर आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे होते. गव्हाणकर बाळापूरपर्यंत त्यांच्या गाडीत गेले. मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांच्या या खासगी दौर्‍याने प्रशासनाची मात्र चांगलीच दमछाक झाली.