अकोला: महान येथील काटेपूर्णा धरणात २६ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, हा जलसाठा अकोला शहरासाठी राखून ठेवला असल्याची माहिती जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी गुरुवारी पालक सचिवांच्या आढावा बैठकीत दिली. मूर्तिजापूर शहर व ६४ खेडी पाणीपुरवठा योजनेसाठी सुकळी लघुप्रकल्पावरून पाणीपुरवठा करण्यात येणार असून, ८४ खेडी पाणीपुरवठा योजनेसाठी वाण धरणात पुरेसे पाणी उपलब्ध असल्याची माहितीही जिल्हाधिकार्यांनी दिली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}