शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
4
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
5
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
6
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
7
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
8
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
9
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
10
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
11
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
12
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
13
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
14
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
15
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
16
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
17
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
18
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
19
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
20
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
Daily Top 2Weekly Top 5

६४ गावांमध्ये पाणीटंचाई; ग्रामस्थांची पायपीट

By admin | Updated: October 23, 2014 02:02 IST

खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती.

अकोला: खारपाणपट्टय़ातील जिल्ह्यातल्या खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, सध्या या गावांना आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे दिवाळी सणाच्या कालावधीतही पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत ६४ गावांना पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणातून खांबोरा जवळील उन्नई बंधार्‍यात पाणी सोडले जाते आणि उन्नई बंधार्‍यातून ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. यावर्षींच्या पावसाळ्यात सार्वत्रिक दमदार पावसाअभावी महान येथील काटेपूर्णा धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध नसल्याच्या स्थितीत, या धरणातील उपलब्ध जलसाठा अकोला शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात उन्नई बंधार्‍यातील जलसाठा संपल्याने, खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना गेल्या १५ दिवसात पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार गत १८ ऑक्टोबर रोजी महान येथील काटेपूर्णा धरणातून खांबोरा पाणीपुरवठा योजनेसाठी उन्नई बंधार्‍यात पाणी सोडण्यात आले. त्यानंतर या योजनेंतर्गत गावांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. सध्या या योजनेंतर्गत गावांना सात दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. काटेपूर्णा धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध नसल्याच्या स्थितीत खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत हिवाळ्यातच पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे.