शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार योजनेचा कोटींचा खर्च पाण्यात

By admin | Updated: August 29, 2015 00:17 IST

तेल्हारा तालुक्यातील वास्तव; हजारो गॅलन पाणी गेले वाहून!

तेल्हारा (जि. अकोला) : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत आकोट उपविभागातील तेल्हारा तालुक्यात नदी खोलीकरणाचे काम लोकसहभागातून करण्यात आले असले तरी, यातील माती उत्खननातून काहींनी हजारोंची कमाई केली. पाणी अडविण्याची कोणतीही तरतूद न करता केवळ खोलीकरणच करण्यात आल्याने नदी-नाल्यांमधील हजारो गॅलन पाणी वाहून गेले. महाराष्ट्र शासनाने मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत तेल्हारा तालुक्यात गौतमा नदी, बेलखेड येथील आस नदी, मनब्दा येथील विद्रुपा नदीचे खोलीकरण करण्यात आले. आकोट उपविभागात ह्यपाणी अडवा पाणी जिरवाह्ण मोहिमेला मोठा वाव आहे. या विभागात ५२ पेक्षाही अधिक नदी-नाले आहेत. या नदी-नाल्यांचे पाणी अडवून शेतकर्‍यांच्या सिंचनाच्या प्रश्नासोबतच खारपाणपट्टय़ातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निकाली निघू शकतो. आदिवासी भागातील पाझर तलावात काही नद्यांचे पाणी वळवून पाण्याच्या पातळीत वाढ करता येऊ शकते. परिसरातील नदी-नाल्यांवर बंधारे व्हावे, अशी मागणी गत अनेक वर्षांपासून होत आहे. परंतु या महत्त्वपूर्ण विषयाकडे विभागातील अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत नद्यांचे खोलीकरण करण्यात आले. ही कामे करताना नद्यांचे पाणी अडविण्याचे काम करण्यात आले नाही. त्यामुळे पावसाळय़ात नद्या-नाल्यांमधील हजारो गॅलन पाणी वाहून गेले. हे पाणी अडविले असते, तर सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला असता. (शहर प्रतिनिधी)