शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

१५ कोटींच्या रस्त्यांना ‘मार्किंग’ची प्रतीक्षा

By admin | Updated: November 24, 2014 01:38 IST

अकोला मनपाचा फंडा; काम रखडले.

अकोला: रस्ते दुरुस्तीसाठी प्राप्त १५ कोटींच्या अनुदानातून शहरा तील १८ रस्त्यांची कामे मार्गी लागल्याचा गवगवा करणार्‍या मनपा प्रशासनाने आता कामाला सुरुवात होण्यापूर्वी रस्त्यांची ह्यमार्किंगह्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता मुंबईतील एजन्सीकडे विचारणा करण्यात आली असून, जोपर्यंत ह्यमार्किंगह्णच्या कामाला सुरुवात होत नाही, तोपर्यंत रस्ते दुरुस्तीला सुरुवात होणार नसल्याचे निश्‍चित झाले आहे.तत्कालीन आयुक्त दीपक चौधरी यांच्या प्रयत्नांमुळे दुरवस्था झालेल्या रस्ते दुरुस्तीसाठी शासनाने १५ कोटींचे अनुदान मंजूर केले. २0१३ मध्ये प्राप्त झालेल्या अनुदानातून मुख्य १८ रस्त्यांची दुरुस्ती होणार असून, यामध्ये डांबरीकरणाचे १२ तर उर्वरित सहा सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे निर्माण होईल. मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी ई-निविदा प्रक्रिया एकदा नव्हे तर तब्बल सात वेळा प्रकाशित केली. निविदा प्रक्रियेत प्रशासनाने नमूद केलेल्या क्लिष्ट शर्ती व अटींमुळे डांबरी रस्त्यांचा विषय निकाली निघाला असून, सिमेंट रस्त्यांकडे कंत्राटदारांनी पाठ फिरवली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपण्यापूर्वीच प्रशासनाने शहरातील १८ रस्त्यांची कामे लवकरच सुरू होण्याचा गवगवा केला. तोपर्यंत सिमेंट रस्त्यांची निविदा अधांतरीच होती. प्रशासनाची भूमिका लक्षात घेता, सत्ताधारी भाजप, शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनीदेखील घाईघाईत सिव्हिल लाईन चौकात रस्ता उद्घाटनाची औपचारिकता पार पाडली; परंतु झाले नेमके उलटेच. आजपर्यंत सहापैकी चार सिमेंट रस्त्यांसाठी निविदाच सादर न झाल्याने सिमेंट रस्त्यांचे काम होईल की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. हा प्रकार कमी म्हणून की काय, डांबरी रस्त्यांचे कार्यादेश घेणार्‍या कंत्राटदारांना तूर्तास काम न करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. डांबरी रस् त्यांसह सिमेंट रस्त्यांचे आधी मोजमाप होईल, याकरिता मुंबईस्थित एजन्सीमार्फत संपूर्ण १८ रस्त्यांची ह्यमार्किंगह्ण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. एकूणच, १८ रस्त्यांच्या मुद्यावर प्रशासनाच्या कोलांटउड्या लक्षात घेता, अकोलेकरांच्या संयमाची परीक्षा घेतल्या जात असल्याचे चित्र आहे.