शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे होईल जलक्रांती!

By admin | Updated: July 15, 2015 00:54 IST

बुलडाण्याला वरदान; विदर्भामध्ये २.९0 लक्ष हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार.

वीरेंद्रसिंह राजपूत / टाकरखेड (जि. बुलडाणा) : हैद्राबाद येथील राष्ट्रीय जलविकास प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्यात वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा ह्यप्री-फिजिबिलिटीह्ण रिपोर्ट तयार केला असून, या अहवालानुसार गोदावरी खोर्‍यातील प्राणहिता उपखोर्‍यामध्ये असलेल्या वैनगंगा नदीमधून महाराष्ट्राच्या वाट्याचे वाया जाणारे पाणी तापी खोर्‍याच्या पूर्णा उपखोर्‍यापर्यंंंत वळते करण्याचे प्रस्तावित केले आहे. यामुळे भंडारा, नागपूर, वर्धा व अमरावती प्रादेशिक विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला व बुलडाणा या जिल्ह्यांना सिंचन व बिगर सिंचन वापराकरिता पाणी उपलब्ध होणार आहे. वैनगंगा नदीवर असलेल्या गोसेखुर्द प्रकल्पास्थळी २७२१ दलघमी पाणी अखर्चित/अनियोजित असून, खोर्‍याअंतर्गत नियोजनास वाव नसल्यामुळे हे पाणी राज्याबाहेर वाहून जाते. प्रत्यक्षात अद्ययावत जलनियोजनानुसार मात्र गोसेखुर्द प्रकल्पस्थळी महाराष्ट्राच्या वाट्याचे १९१0 दलघमी पाणी अनियोजित आढळते. सदरचे अतिरिक्त पाणी सुमारे ५७८ कि.मी. लांबीच्या पुरवठा कालव्याव्दारे बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा नदीवरील धरणामध्ये वळते मार्गामध्ये नवीन साठे निर्माण करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. गोसेखुर्द धरणस्थळी पुर्णसंचय पातळी २४३.00 मीटर असून वर नमुद केल्याप्रमाणे पावसाळ्याचे वाहून जाणारे सुमारे १९१0 दलघमी पाणी वळविण्याकरीता गोसी खुर्द धरणाच्या उजव्या बाजुस तीरावरून वळण कालवा प्रस्तावित करण्यात आला आहे. या कालव्याची नळगंगा धरणापर्यंंत एकुण लांबी ४७८.२0 किमी असून 0 ते १९४ किमी कालवा नागपूर विभागातून जातो तर उर्वरीत २८४.२0 किमी कालवा अमरावती प्रादेशिक विभागातून जातो. या वळण कालव्यामध्ये तीन टप्प्यात एकुण ८0 मीटर उपसा लिफ्ट प्रस्तावित आहे. यापैकी दोन उपसा (२६ किमी वर, ४0 मीटर, ४७ कि.मी. वर २0 मीटर) नागपूर प्रादेशिक विभागामध्ये प्रस्तावित असून एक उपसा (२९३.५0 किमीवर २0 मीटर) अमरावती प्रादेशिक विभागामध्ये प्रस्तावित आहे.