उषा गजानन ढोबळे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:18 IST2021-04-11T04:18:36+5:302021-04-11T04:18:36+5:30

अकोला: खडकी येथील रहिवासी उषा गजानन ढोबळे (४७) यांचे शनिवार, दि. १० एप्रिल रोजी सकाळी ४ वाजताच्या सुमारास निधन ...

Usha Gajanan Dhoble passed away | उषा गजानन ढोबळे यांचे निधन

उषा गजानन ढोबळे यांचे निधन

अकोला: खडकी येथील रहिवासी उषा गजानन ढोबळे (४७) यांचे शनिवार, दि. १० एप्रिल रोजी सकाळी ४ वाजताच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, दोन मुली असा बराच मोठा आप्त परिवार आहे. (फोटो)

-----------------------------------------------

रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

रोहनखेड: अकोट तालुक्यातील रोहनखेड येथे रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याची घटना घडली.

शेतकरी श्रीकृष्ण देवमन वानखडे (६५) हे गुरे चरायला शेतात गेले असता शनिवारी दुपारच्या सुमारास रानडुकराने त्यांचावर हल्ला चढविला. या हल्ल्यात श्रीकृष्ण वानखडे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांनी आरडाओरडा केल्याने बाजूच्या शेतात असलेल्या संजय चव्हाण व बाळकृष्ण वानखडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांची रानडुकराच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी अकोट येथील खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले. रोहनखेड परिसरात रानडुकरांचा हैदोस वाढला असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने पंचनामा करून शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Usha Gajanan Dhoble passed away