विनयभंग प्रकरणात आरोपीला दोन वर्षांंचा कारावास

By Admin | Updated: February 19, 2017 02:19 IST2017-02-19T02:19:33+5:302017-02-19T02:19:33+5:30

राजुरा घाटे येथील एका विनयभंग प्रकरणात आरोपीला दोन वर्षे कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा

Two years imprisonment in the case of molestation | विनयभंग प्रकरणात आरोपीला दोन वर्षांंचा कारावास

विनयभंग प्रकरणात आरोपीला दोन वर्षांंचा कारावास

मूर्तिजापूर, दि. १८- : राजुरा घाटे येथील एका विनयभंग प्रकरणात आरोपीला दोन वर्षे कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा स्थानिक न्यायाधीश ए. व्ही. डाखोरे यांनी १८ फेब्रुवारी रोजी सुनावली आहे.
या खटल्यातील पीडित व फिर्यादी महिलेचा पती मुंबई येथे असताना ४ सप्टेंबर २0१४ च्या सकाळी ५.३0 वाजताच्या सुमारास सदर महिला गोठय़ामध्ये महालक्ष्मी पूजेकरिता फुले आणण्याकरिता गेली. त्यावेळी तिचा नात्याने चुलत दीर असलेला आरोपी अमोल घाटे याने तिचा विनयभंग केला. या घटनेबाबत फिर्यादी महिलेने मूर्तिजापूर येथील पोलीस स्टेशनमध्ये अमोल घाटेविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३५४, २९४ प्रमाणे गुन्हा नोंदविला होता.
सदर प्रकरणात नऊ साक्षीदार तपासण्यात आले. त्यानंतर न्यायाधीश ए.व्ही. डाखोरे यांनी आरोपी अमोल डिगांबर घाटे याला दोन वर्षांंंचा कारावास व पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात येत असल्याचा आदेश दिला. या प्रकरणात सरकारतर्फे अभियोक्ता दिप्ती बोबडे यांनी बाजू मांडली.

Web Title: Two years imprisonment in the case of molestation